गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात हिंदी भाषेवरून राजकीय चर्चा झाली. विरोधकांनी सत्ताधारी पक्षांवर हल्लाबोल केला. अखेर फडणवीस सरकारने हिंदी शिकवण्याचा निर्णय मागे घेतला. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात इंग्रजी भाषेचा मुद्दा उपस्थित झाला. भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी इंग्रजी कार्यक्रम पत्रिकेवर आक्षेप घेतला. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना समजावून सांगितले की, कामकाज मराठी आणि इंग्रजीत चालते.