मुंबईच्या वरळी डोममध्ये जवळपास २० वर्षांनंतर ठाकरे कुटुंब एकत्र आलं. शिवसेना (उद्धव ठाकरे) व मनसेचे कार्यकर्ते आणि जुने शिवसैनिक यांच्यासाठी हा प्रसंग उत्साहाचा ठरला. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विविध पक्षांना संदेश गेले. शिंदे गटासाठी हे आव्हान ठरू शकतं. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता आहे.