scorecardresearch

डोंबिवली

डोंबिवली (Dombivli) हे महाराष्ट्र राज्याच्या ठाणे जिल्ह्यातील मोठ्या शहरांपैकी एक आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राचा बहुतांश भाग डोबिवलीमध्ये येतो. मुंबई, ठाणे, नवीमुंबई यांच्यानंतर प्रमुख शहरांमध्ये डोंबिवलीचा समावेश होतो. हे शहर पश्चिमेकडून चोळेगांव, पूर्वेकडून आयरेगाव, दक्षिणेकडून पाथर्ली आणि उत्तरेकडून ठाकुर्ली या गावांनी वेढलेले आहे. डोंबिवलीचा इतिहास फार जुना आहे. इ.स.१०७५ सालच्या राजा हरपाल देव याच्या शिलालेखात डोंबिवलीचा उल्लेख आढळतो. जेव्हा पोर्तुगीज डोंबिवलीमध्ये आले, तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपले तळ उभारले होते. इ.स.१७३० मध्ये पेशवेकाळात डोंबिवलीचा उल्लेख आढळतो. १९ व्या शतकात डोंबिवलीतील शेतकरी भात पिकवत असत आणि कल्याण ते मुंबई येथे त्याची विक्री करत असत. या ठिकाणी राहणारे मूळ निवासी ‘डोंब’ लोक होते आणि त्यांच्यावरुन या ठिकाणाला डोबिवली असे नाव पडले असे मानले जाते.


सुरुवातीला डोंबिवलीला शहराचे स्वरुप मिळाल्यावर तेथे नगरपालिका तयार करण्यात आली. पुढे ऑक्टोबर १९८३ मध्ये कल्याण आणि डोबिंवली दोन्ही शहरांची मिळून एकच महानगरपालिका स्थापन केली गेली. मुंबईतून मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक लोक डोंबिवलीमध्ये वास्तव्याला गेले. डोंबिवलीला प्रामुख्याने मराठी भाषिकांचे, मराठी संस्कृतीचे शहर मानले जाते. हिचा महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून गौरव होतो. डोंबिवलीची ओळख असलेल्या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेला १९९९ मध्ये सुरुवात झाली.


डोंबिवली शहराच्या लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळते. लोकसंख्येचा विचार करायला गेल्यास डोंबिवलीची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १२,४६,३८१ इतकी आहे. हे शहर मुंबई लोकलसाठीही महत्त्वपूर्ण आहे. मुंबईतील बहुतांश नोकरदार वर्ग हा या शहरात वास्तव्याला असल्याने एका प्रकारे हे शहर आर्थिक राजधानी पाठबळ पुरवते असे म्हणता येईल.


Read More
Shridhar Mhatre road , Dombivli, road ,
डोंबिवलीत श्रीधर म्हात्रे रखडलेला रस्ता मार्गी लावण्यासाठी नागरिकांचे आंदोलन

मागील वर्षापासून रखडलेला डोंबिवली पश्चिमेतील श्रीधर म्हात्रे चौक ते अनमोल नगरी रस्ता मार्गी लावण्यास प्रशासनाकडून चालढकल सुरू आहे.

illegal building construction with fake 7 12 document
डोंबिवली पश्चिमेत बनावट सात बारा उताऱ्यांच्या आधारे बेकायदा इमारती उभारणाऱ्या २४ जणांवर गुन्हे

बनावट सात बारा उताऱ्यांच्या आधारे कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता भूमाफियांनी दोन बेकायदा इमारती उभारल्या.

Pratap Sarnaik shared the story of a journey from being an auto-rickshaw driver in Dombivli to becoming the Transport Minister
डोंबिवलीतील रिक्षा चालक ते परिवहन मंत्री प्रवासाचा प्रताप सरनाईकांनी सांगितला किस्सा

आपल्या जीवन प्रवासाची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कल्याण येथील उंबर्डे भागातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय इमारत उद्घाटनाच्या कार्यक्रमात रविवारी…

Tiranga Yatra , Dombivli , Indian Army, loksatta news,
भारतीय लष्कराच्या समर्थनार्थ डोंबिवलीत तिरंगा यात्रा

भारतीय लष्कराच्या पाकिस्तान विरुध्दच्या यशस्वी ऑपरेशन सिंदूर कारवाईचा गौरव आणि भारतीय लष्कराच्या समर्थनार्थ रविवारी सकाळी भाजप, शिवसेनेतर्फे डोंबिवलीत तिरंगा यात्रा…

Case filed against Deepak Beer Shop owner in Golwali, Dombivli for selling alcohol to customers in an open space without a license
डोंबिवलीत गोळवलीमधील दीपक बीअर शाॅपी दुकान चालकावर गुन्हा, परवाना नसताना मोकळ्या जागेत ग्राहकांना दारूची विक्री

मानपाडा पोलिसांनी बीअर शाॅपीचे मालक अनिकेत गुडेकर यांच्या विरुध्द महाराष्ट्र प्रतिबंधित कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.

Dombivli cement concrete road issues news in marathi
डोंबिवलीत श्रीधर म्हात्रे चौक सीमेंट काँक्रीट रस्त्याचे काम रखडल्याने नागरिक नाराज; गरीबाचावाडा उत्कर्ष मंडळाचा आंदोलनाचा इशारा

श्रीधर म्हात्रे चौक ते अनमोल नगरी या सुमारे ५०० मीटर लांबीच्या सीमेंट काँक्रीट रस्त्याच्या रूंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम गेल्या वर्षीपासून…

Shailganga Urban Forest Project to be implemented in Dombivli MIDC by Puntambetkar Trust
डोंबिवली एमआयडीसीत शैलगंगा शहरी वन प्रकल्प, शहरी भागात जंगल विकासावर भर

डोंबिवली एमआयडीसीतील मिलापनगर भागात नानासाहेब पुणतांबेतकर न्यासतर्फे शैलगंगा शहरी वन प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Ragho Heights controversy news in marathi
डोंबिवली आयरेतील बेकायदा राघो हाईटसवर कारवाई करण्यास रहिवाशांचा विरोध, २० पोलीस असताना कारवाई न करताच तोडकाम पथक माघारी

अगोदर आमचे पुनर्वसन करा, मगच तुम्हाला काय करायचे ते करा, अशी आक्रमक भूमिका रहिवाशांनी घेतली. विरोध करण्यास महिला वर्ग आघाडीवर…

Mahanagar Gas Pipeline burst in Dombivli incident
डोंबिवली गोग्रासवाडीत रस्ते खोदकाम करताना महानगरची गॅस वाहिनी फुटली; गॅस पसरताच नागरिकांमध्ये घबराट

गॅसचा वास परिसरात पसरताच नागरिकांमध्ये घबराट पसरली. गॅस कसा बंद करायचा याची कोणतीची माहिती नागरिकांना नव्हती. आणि महानगर गॅसचा आपत्कालीन…

Shardul Auti
डोंबिवलीतील टिळकनगर शाळेतील शार्दुल औटीने दृष्टीदोषावर मात करत मिळविले ९७ टक्के गुण; कल्याणमधील कचरावेचकांच्या मुलांचे यश

दृष्टी दोष असुनही त्यावर मात करत, डोंबिवलीतील टिळकनगर शाळेतील शार्दुल संतोष औटी या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत ९७.८० टक्के गुण मिळविले…

Pahalgam attack , Dombivli , tourist , Son ,
डोंबिवलीतील पहलगाम हल्ल्यातील मृत पर्यटकाच्या मुलाला दहावीत ८० टक्के गुण

डोंंबिवलीतील तीन पर्यटकांचा पहलगाम बेसरन पठारावर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. या तीन मृत पर्यटकांमधील हेमंत जोशी यांचा मुलगा इयत्ता…

action against hawkers in dombivli east
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात फेरीवाल्यांंवर कारवाई

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांवर फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी या फेरीवाल्यांंसह फडके रस्ता, नेहरू रस्ता, बाजीप्रभू…

संबंधित बातम्या