उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) हे भारतीय राजकारणी आणि महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे ते अध्यक्ष देखील आहेत. उद्धव ठाकरे यांचा जन्म मुंबईत झाला आणि महाराष्ट्रातील बालमोहन विद्यामंदिरमधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्यांना दोन भाऊ असून राज ठाकरे चुलत भाऊ आहेत. ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० रोजी झाला.
जमशेटजी जीजेभॉय स्कूल ऑफ आर्टचे पदवीधर उद्धव ठाकरे, यांनी रश्मी पाटणकर यांच्याशी लग्न केले आणि त्यांना दोन मुले आहेत. त्यांचा मोठा मुलगा आदित्य ठाकरे हे देखील शिवसेनेचे नेते आहेत आणि सध्या ते महाराष्ट्र सरकारचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री म्हणून काम पाहत आहेत. उद्धव ठाकरे हे निपुण छायाचित्रकार आहेत. त्यांची ‘महाराष्ट्र देशा’ आणि ‘पहावा विठ्ठल’ ही दोन पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.
२००२ मध्ये मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे (Shivsena) प्रचार प्रभारी बनल्यावर ठाकरे यांनी राजकीय पदार्पण केले आणि पक्षाचा विजय झाला. २००३ मध्ये त्यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आणि २००६ मध्ये ते त्यांच्या पक्षाचे राजकीय मुखपत्र सामनाचे मुख्य संपादक झाले. त्याच वर्षी राज ठाकरे यांनी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. २०२१ मध्ये वडिलांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली आणि २०१३ मध्ये अध्यक्षपदी विराजमान झाले. कोणत्याही सरकारमध्ये स्थान मिळवणारे ते ठाकरे कुटुंबातील पहिले सदस्य ठरले. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. Read More
कोविडचा सामाजिक आजार, पाठोपाठ तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आजारपण आणि यातून निर्माण झालेला प्रशासकीय आजार यात अडकलेल्या महाराष्ट्राच्या ‘माहिती…
उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मशिदीला भेट देण्यापासून फडणवीसांच्या बाबरी मशीद दाव्यापर्यंत अनेक गोष्टींवर भाष्य केलं.…
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी झाली. यात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला.…
उद्धव ठाकरेंनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगासमोरील सुनावणीवर भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्या्ंनी शिवसेनेच्या पक्षघटनेचा दाखलाही दिला. (सर्व…