News Flash

यूटीआय एएमसी आणि माझगांव डॉक यांची प्रारंभिक भागविक्री मंगळवारपासून

प्रति समभाग ५५२ ते ५२४ रुपये किंमत पट्टा निश्चित केला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

म्युच्युअल फंड घराणे यूटीआय असेट मॅनेजमेंट कंपनीने गुरुवारी प्राथमिक सार्वजनिक भागविक्रीची घोषणा करताना, प्रति समभाग ५५२ ते ५२४ रुपये किंमत पट्टा निश्चित केला आहे.

येत्या मंगळवार २९ सप्टेंबरपासून  ते १ ऑक्टोबपर्यंत चालणाऱ्या भागविक्रीतून, किंमत पट्टय़ाच्या वरील किंमतीनुसार २,१६० कोटी रुपये उभे केले जातील. निप्पॉन लाइफ इंडिया एएमसी आणि एचडीएफसी एएमसीनंतर भांडवली बाजारात सूचीबद्ध होणारी यूटीआय एएमसी हे तिसरे म्युच्युअल फंड कंपनी आहे. प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्य असलेले ३.८९ कोटी समभाग विक्रीला खुले होणार आहेत. स्टेट बँक, एलआयसी, बँक ऑफ बडोदा,  पंजाब नॅशनल बँक आणि टी. रोव हे यूटीआयचे प्रवर्तक या भागविक्रीमार्फत आपला हिस्सा विकणार आहेत. विक्रीपश्चात टी रोव कंपनीतील सर्वात मोठा भागधारक असेल.

दुसरीकडे सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण कंपनी माझगाव डॉक शिपबिल्डर्सनेही २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान प्रति समभाग १३५ ते १४५ रुपयांदरम्यान भागविक्री विकणार असल्याची घोषणा करण्यात आली. गुरुवारी मुंबईत झालेल्या एका आभासी पत्रकार परिषदेत, या समभाग विक्रीमार्फत, युद्धनौका बनविणाऱ्या कंपनीतील मालकी हिस्सा भारत सरकारकडून सौम्य केला जाईल. एकूण ३.०५ लाख समभाग विकून ४४४ कोटी रुपये उभारले जाणे अपेक्षित आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2020 1:30 am

Web Title: initial sale of shares of uti amc and mazgaon dock from tuesday abn 97
Next Stories
1 बाजारात गडगडाट
2 गुंतवणूकदारांच्या चार लाख कोटींचा चुराडा
3 चारचाकी-दुचाकीची विक्री तेजीत
Just Now!
X