Grah Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, यावेळी जुलै महिना ग्रहांच्या दृष्टीने खूप खास असणार आहे. कारण- या महिन्यात ग्रहांचा राजा सूर्य, धनाचा दाता शुक्र, कर्मफळ दाता शनी, समृद्धीचा कारक गुरू, व्यवसायाचा दाता बुध व ग्रहांचा सेनापती मंगळ हे चालीत बदल करणार आहेत. त्यामुळे जुलैमध्ये ६ प्रमुख ग्रहांच्या चालबदलाने काही राशींच्या लोकांचे नशीब चमकू शकते. त्यामुळे त्यांना करिअर आणि व्यवसायात विशेष प्रगती साधता येऊ शकते. पण, नेमक्या कोणत्या राशींच्या लोकांना याचा फायदा होणार ते जाणून घेऊ…
मेष
जुलै महिना मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमची लोकप्रियता आणि आदर वाढू शकतो. तुम्ही नवीन काम सुरू करू शकता आणि तुमच्या संबंधित क्षेत्रात उच्च पद मिळवू शकता. वैवाहिक जीवनात गोडवा आणि आनंद राहील. तुम्ही तुमच्या जोडीदारासह नवीन ठिकाणी भेट देऊ शकता. तुम्हाला नोकरीत पदोन्नती किंवा नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळू शकते. जर तुम्ही व्यवसाय करीत असाल, तर नवीन अॅग्रीमेंट्स आणि नफा मिळण्याच्या संधी आहेत.
कन्या
जुलै महिना कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतो. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात विशेष प्रगती साधता येऊ शकते. तसेच विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन उत्तम राहील. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तुमची लोकप्रियता वाढेल आणि लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील. तुम्हाला जुन्या आरोग्य समस्यांपासूनही आराम मिळेल.
मीन
जुलै महिना मीन राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकतो. या काळात तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. तुमची कार्यशैली सुधारेल. तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. या काळात तुम्हाला परदेश प्रवासाची किंवा तिथे नोकरीची संधी मिळू शकते. धार्मिक आणि सामाजिक कार्यात तुमची सक्रियता वाढेल. त्यामुळे समाजात तुमचा आदरही वाढेल. जर तुम्ही अभ्यास किंवा लेखनाशी संबंधित काम करीत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ राहील.