Rahu Ketu Gochar 2023: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक वेळी आपली राशी बदलतो. ग्रहांच्या बदलांचा चांगला वाईट परिणाम सर्व राशींवर होतो. आता ३० ऑक्टोबर रोजी राहू-केतूचे संक्रमण होणार आहे. राहू ग्रह मेष राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करेल. तसेच केतू ग्रह तूळ राशीतून बाहेर पडून कन्या राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार, राहू हा एक प्रभावशाली ग्रह आहे. राहूमुळे जीवनात अनेकदा संकटे आल्याचे आपण ऐकतो. तर दुसरीकडे राहु शुभ असल्यामुळे व्यक्तीचे जीवनही आनंदाने भरते. कधी कधी राहू शुभ फलही देतो. त्यामुळे राहू-केतुचे गोचर काही राशींसाठी फायद्याचे ठरु शकते. चला तर पाहूयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

‘या’ राशींना धनलाभ होऊ शकतो

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांसाठी राहुचे संक्रमण खूप चांगले ठरु शकते. या राशीतील लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळून धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी आनंदाची बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी प्रमोशन होऊ शकतं. आर्थिक अडचणी दूर होऊन त्यांच्या आयुष्यात बरेच बदल होऊ शकतात. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे प्रेम आणि आपुलकी कायम राहण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा : मंगळदेवाचं तूळ राशीत प्रवेश; २० दिवस वृषभसह ‘या’ ३ राशींना अचानक मिळणार भरपूर पैसा? पाहा तुमची रास आहे का यात? )

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांना राहू शुभ परिणाम देऊ शकतात. या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला यश मिळू शकते. पद, प्रभाव आणि प्रतिष्ठा यांचा लाभ मिळू शकतो. प्रवासाचे योग आहेत ज्यातून तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. भौतिक सुखसोयीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

कन्या राशी

कन्या राशीतील मंडळीना राहूच्या राशी परिवर्तनामुळे लाभ होण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात धनलाभ होण्याची शक्यता आहे. अनेक मार्गाने या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमच्या कार्यक्षेत्रात मोठा बदल होऊन तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकतो. या राशीतील लोकांना व्यवहारात चांगलं यश मिळू शकतो. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत काही प्रलंबित प्रकरण असल्यास त्याचा निर्णय तुमच्या बाजूने लागू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)