Surya Dev Favourite Zodiac : सूर्य देवाला ग्रहाचा राजा मानले जाते. ते ऊर्जेचे स्त्रोत आहे. जेव्हा त्यांचा उदय होतो तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड सकारात्मक ऊर्जेने उठतो आणि लोक दिवसाची सुरूवात करतात. सूर्य देवाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. तु्म्हाला माहिती आहे सूर्य देवाच्या तीन प्रिय राशी आहेत, ज्यांना सुरुवातीपासून सूर्य देवाची कृपा प्राप्त करण्याचे वरदान मिळाले आहे. या लोकांना कोणतीही समस्या किंवा अडचण येत नाही. जाणून घेऊ या, त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत.
धनु राशी (Dhanu Rashi)
धनु राशी सूर्य देवाची प्रिय राशी मानली जाते. या राशीचे स्वामी देव गुरू मानले जाते. ते सूर्य देवाचे सुद्धा गुरू आहेत. त्यामुळे आपल्या गुरूच्या आधिपत्य असणार्या धनु राशीवर सूर्य देवाची कृपा दिसून येते. या राशीच्या लोकांना मान सन्मान व पैसा खूप मिळतो. या लोकांना आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही.
सिंह राशी (Singh Rashi)
सिंह राशीचे स्वामी स्वत: ग्रहांचे राजा सूर्य देव आहेत. त्यामुळे या लोकांवर सूर्य देवाच्या प्रेमाचा वर्षाव होतो. सूर्याच्या कृपेने या राशीच्या लोकांमध्ये नेतृत्व क्षमता भरभरून असते. लोक त्यांच्याकडे समस्या सोडवण्यासाठी जातात त्यांच्याजवळ पैशांची कमतरता कधीही भासत नाही. ते करिअरमध्ये खूप यश प्राप्त करतात. त्यांना व्यवसायात चांगला नफा मिळतो.
मेष राशी (Mesh Rashi)
या राशीचे स्वामी ग्रह मंगळ ग्रह मानले जाते ज्यांची सूर्य देवाबरोबी चांगली मैत्री आहे. आपल्या मित्र राशीवर सूर्यदेवाची नेहमी कृपा दिसून येते. सूर्य देवाच्या आशीर्वादाने मेष राशीचे लोक जीवनात खूप निरोगी जीवन जगतात. या राशीचे लोक दृढ निश्चयी, हिम्मत आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण राहतात. त्यांनी एखादी गोष्ट ठरवली तर पूर्ण करण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करतात. सूर्य देवाच्या कृपेने हे आयुष्यात खूप यशस्वी होतात.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)