News Flash

नांदेड रेल्वे विभागात समस्या अधिक

मुदखेड ते परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.

नांदेड रेल्वे विभागात समस्या अधिक
भारतीय रेल्वे

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यांची कबुली

मराठवाडय़ातील नांदेड विभागात रेल्वेच्या अधिक समस्या आहेत, अशी कबुली देतानाच समस्या सोडवण्यासाठी सवरेतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यांनी शनिवारी येथे दिली. औरंगाबादेतील मुकुंदवाडी रेल्वे स्थानकावर सुविधांचे सुरू असलेले कामकाज लवकरच पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.

औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर सुरक्षारक्षक, चालक, पॉईंटमन, कर्मचाऱ्यांसाठी तीन तारांकित हॉटेलच्या धर्तीवर बांधलेल्या हॉलिडे कॅम्पच्या (विश्रामगृह) उद्घाटनासाठी आलेले महाव्यवस्थापक विनोदकुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नांदेड रेल्वे विभागातील समस्यांबाबत विचारले असता तेथील अडचणी कबूल केल्या. तेथील प्रलंबित मागण्यांची यादी मोठी असल्याचे सांगून काही समस्या तत्काळ मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. तर काही अडचणी दूर होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागेल, असेही ते म्हणाले. मुदखेड-परभणी दुहेरीकरणाचे काम पूर्णत्वापर्यंत आले असून मिरखेल ते परभणी हे दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मार्चअखेर काम पूर्ण होईल. मुदखेड ते परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. मंजुरी मिळताच तेही काम त्वरित सुरू करण्यात येईल, असेही विनोदकुमार यांनी सांगितले. मुकुंदवाडी रेल्वे स्थानकावरील सुविधांबाबत बोलताना विनोदकुमार म्हणाले, येथे सध्या सुरू असलेली कामे प्रगतीपथावर आहेत. उर्वरित कामेही लवकरच सुरू करण्यात येतील आणि पूर्णत्वासाठी आवश्यक तो पाठपुरावा केला जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2017 12:18 am

Web Title: more problems in nanded railways division
Next Stories
1 प्रचारसभेत पंकजा मुंडेंचे व्यासपीठ कोलमडले!
2 निजामकालीन सर्व दस्तऐवज हैदराबादकडून मागवणार
3 पोलिसांच्या ताब्यातील संशयिताचा मृत्यू
Just Now!
X