scorecardresearch

Scorpio-N च्या मजबुतीवर आनंद महिंद्रा म्हणाले, ‘या कारला उडवण्यासाठी रोहित शेट्टीला…’

अलीकडेच, जेव्हा महिंद्राने त्याच्या आगामी स्कॉर्पिओ-एनचा टीझर रिलीज केला, तेव्हा रोहित शेट्टीबद्दलचे मीम्स इंटरनेटवर फिरू लागले.

On the strength of Scorpio-N Anand Mahindra said Rohit Shetty needs an atomic bomb to blow up this car
एका मीमने महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांचे लक्ष वेधून घेतले. (File Photo)

चित्रपट निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी त्याच्या चित्रपटांमध्ये दमदार अ‍ॅक्शनसह महागडी वाहने उडवण्याकरिता ओळखला जातो. रोहितच्या बहुतेक चित्रपटांमध्ये महिंद्रा एसयूव्ही उडताना दाखवण्यात आली आहे. इतकेच नाही, तर अगदी इंटरनेटही रोहित शेट्टी आणि महिंद्राच्या कारच्या मीम्सने भरलेले आहे. अलीकडेच, जेव्हा महिंद्राने त्याच्या आगामी स्कॉर्पिओ-एनचा टीझर रिलीज केला, तेव्हा पुन्हा एकदा रोहित शेट्टीबद्दलचे मीम्स इंटरनेटवर फिरू लागले. त्यापैकी एकाने महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांचे लक्ष वेधून घेतले. त्यावर त्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

आनंद महिंद्रा यांनी अलीकडेच ट्विटरवर नवीन स्कॉर्पिओ-एनचा टीझर व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यावर एका फॉलोअरने मीम पोस्ट करून प्रतिसाद दिला. या मीममध्ये असे म्हटले आहे की रोहित शेट्टी आता या बातमीने खूप उत्साहित होईल आणि त्याच्या पुढील चित्रपटात त्याला ही गाडी उडवावीशी वाटेल.’ त्या यूजरच्या पोस्टला उत्तर देत आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले की, “रोहित शेट्टी जी, ही कार उडवण्यासाठी तुम्हाला अणुबॉम्बची गरज भासेल.”

नव्या Mahindra Scorpio चा टीझर रिलीज; आनंद महिंद्रा म्हणतात….

आनंद महिंद्रा यांचे हे उत्तर मजेदार असले तरी त्यांच्या उत्तरावरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की कंपनीच्या इतर गाड्यांप्रमाणेच नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ-एन ही एक भक्कम आणि सुरक्षित कार असेल. काही वर्षांपूर्वी ग्लोबल एनकॅपने XUV300 ला 5-स्टार सेफ्टी रेटिंग दिले होते, त्यानंतर कंपनीने सांगितले होते की पुढे जाऊन, ग्लोबल एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये त्यांच्या सर्व नवीन मॉडेल्सना ४ किंवा ५ स्टार मिळतील. तेव्हापासून, महिंद्राने दोन नवीन मॉडेल्स – नवीन थार, आणि XUV700 लॉंच केले आहेत आणि अर्थातच, ग्लोबल एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये दोघांनी अनुक्रमे ४ आणि ५ स्टार सुरक्षा रेटिंग मिळवले आहेत. आणि म्हणूनच, नवीन-जनरल स्कॉर्पिओ ही अपेक्षा नक्कीच पूर्ण करेल. कारची ग्लोबल NCAP क्रॅश चाचणी होईल की नाही हे अद्याप माहित नसले तरी, ती केव्हा होईल हे आपल्याला लवकरच कळेल.

Maruti Alto आणि Royal Enfield च्या पार्ट्सपासून बनवलीय ही विंटेज इलेक्ट्रिक कार; किंमत जाणून बसेल धक्का

महिंद्रा स्कॉर्पिओ २०२२ लाँचची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी ही कार चर्चेचा विषय ठरतेय. स्कॉर्पिओ प्रेमी अद्ययावत वाहनाशी संबंधित सर्व तपशील जाणून घेण्यासाठी उत्सुक असताना, कंपनीने त्याचा अधिकृत टीझर जारी केला आहे. टीझरमध्ये कंपनीने या वाहनाशी संबंधित काही प्रमुख गोष्टींचा खुलासा केला आहे. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, कारमध्ये एक नवीन मोठी टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, कनेक्टेड कार तंत्रज्ञान, सनरूफ आणि असे अनेक लक्झरी वैशिष्ट्ये मिळणार आहेत.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: On the strength of scorpio n anand mahindra said rohit shetty needs an atomic bomb to blow up this car pvp