July Bank Holidays List in India 2025 : बऱ्याचदा असे घडते की, बँकेसंबंधित आपले काही महत्त्वाचे काम असते म्हणून आपण बँकेत जातो, पण तिथे गेल्यावर समजते की आज बँक बंद आहे. तुमच्याबाबतही असे घडले असेल तर बँकेत जाण्यापूर्वी एकदा आरबीआयने जाहीर केलेली सुट्ट्यांची यादी जरूर वाचली पाहिजे. यात जुलै महिन्याचा विचार केल्यास, या महिन्यात बँका तब्बल १३ दिवस बंद राहणार आहेत. या सुट्ट्या प्रत्येक राज्यातील सण, धार्मिक कार्यक्रम आणि साप्ताहिक सुट्ट्यांच्या आधारे ठरवल्या जातात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या यादीनुसार, जुलै २०२५ मध्ये देशभरात एकूण १३ दिवस बँकिंग सेवा बंद राहतील. या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांनुसार निश्चित करण्यात आल्या आहेत.

जुलै महिन्यात कोणत्या दिवशी, कुठे व कोणत्या कारणांसाठी बँका बंद राहतील ते यादी पाहून जाणून घेऊ…

जुलै महिन्यातील बँक सुटट्यांची यादी (July 2025 Bank Holiday List)

एकूण साप्ताहिक सुट्ट्या किती?

जुलैमध्ये चार रविवार (६, १३, २० आणि २७ जुलै ) सर्व राज्यांतील बँका बंद राहतील, तर दुसरा आणि चौथा शनिवार (१२, २६ जुलै) बँका बंद असतील. म्हणजे जुलैमध्ये एकूण ६ साप्ताहिक सुट्ट्यांनिमित्त सर्व राज्यांतील बँका बंद असतील.

स्थानिक सण-समारंभानिमित्त किती सुट्ट्या असतील?

३ जुलै २०२५ : खारची पूजानिमित्त आगरतळामध्ये बँका बंद

५ जुलै २०२५ : गुरु हरगोबिंद सिंहजी यांच्या जयंतीनिमित्त जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद.

१४ जुलै २०२५ : बकरी ईद (ईद-उल-अजहा) निमित्त शिलाँगमध्ये बँका बंद.

१६ जुलै २०२५ : हरेला सणानिमित्त देहरादूनमध्ये बँका बंद.

१७ जुलै २०२५ : यू तिरोट सिंग यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिलाँगमध्ये बँका बंद.

१९ जुलै २०२५ : केर पूजेनिमित्त आगरतळामध्ये बँका बंद.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२८ जुलै २०२५ : द्रुकपा त्से-शे सणानिमित्त गंगटोकमध्ये बँका बंद.