केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) कडुन राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे (सीटीईटी) प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट जारी करण्यात आले आहे. परीक्षेची तारीख अजुनही जाहीर करण्यात आलेली नाही. पण उमेदवार त्यांची परीक्षा कधी आहे ते प्रवेशपत्रावर पाहू शकतात.

ctet.nic.in या अधिकृत वेबसाईटवरून प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केला आहे, त्यांना नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख टाकून प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे.

आणखी वाचा- KVS Recruitment 2022: केंद्रीय विद्यालयामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या कुठे करायचा अर्ज

परीक्षेची तारीख, परीक्षा केंद्र, परीक्षेची वेळ अशी महत्त्वाची माहिती प्रवेशपत्रावर देण्यात आली आहे. उमेदवारांनी ही माहिती तपासून त्यात काही चुक असल्यास केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळास याबाबत माहिती द्यावी. परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी प्रवेशपत्रासह फोटो आयडी प्रूफही आणणे बंधनकारक आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी पुढील पायऱ्या वापरा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवेशपत्र डाउनलोड करण्याच्या पायऱ्या

  • ctet.nic.in ही अधिकृत वेबसाईट उघडा
  • होमपेजवरील ‘एडमिट कार्ड’ पर्यायावर क्लिक करा.
  • तिथे रेजिस्ट्रेशन नंबर व जन्म तारीख सबमिट करा.
  • त्यानंतर तुमचे प्रवेशपत्र स्क्रिनवर दिसेल.
  • इथून प्रवेशपत्राची प्रिंट आउट काढता येईल.