IIT Bombay Bharti 2023 : भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (Indian Institute Of Technology Bombay) अंतर्गत ‘मुख्य अभियंता, मुख्य सुरक्षा अधिकारी, ग्रंथालय अधिकारी, कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक’ या पदांच्या एकूण ४२ रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून उमेदवार आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरु शकतात. भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई भरती २०२३ –
पदाचे नाव – मुख्य अभियंता, मुख्य सुरक्षा अधिकारी, ग्रंथालय अधिकारी, कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक.
एकूण पदसंख्या – ४२
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून सविस्तर माहितीसाठी भरतीची मूळ जाहिरात अवश्य पाहा.
नोकरीचे ठिकाण – मुंबई
हेही वाचा – ITI उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! PGCIL अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती सुरु, सविस्तर माहिती जाणून घ्या
अर्जाची पद्धत – ऑनलाईन
निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ डिसेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट – https://www.iitb.ac.in/
असा करा अर्ज –
- भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात.
- अर्ज करण्यापुर्वी सूचना काळजीपूर्वक वाचा.
- अपूर्ण माहिती भरलेला अर्ज नाकारला जाईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ डिसेंबर २०२३ आहे.
भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.
https://drive.google.com/file/d/1XA5x7DXLSBEwawSuPx8r5u0X6Qp3jsBJ/view