सुहास पाटील

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे (नियोजन विभागांतर्गत महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था) व एमएसएमई टेक्नॉलॉजी सेंटर, इंडो जर्मन टूल रुम (IGTR),औरंगाबाद (सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यम मंत्रालयांतर्गत भारत सरकारची संस्था) यांचेद्वारे मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी समाजाच्या नॉन-क्रिमी लेअर गटाच्या युवक-युवतींसाठी पूर्ण वेळ, अनिवासी, निशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रवेश.

(I) १० वी उत्तीर्ण पात्रता असलेले सर्टिफिकेट कोर्सेस (ठरदा लेव्हल-४) –
(१) CNC टर्निग – औरंगाबाद येथे २० जागा, वाळुज २० जागा (कालावधी ६ महिने).
(२) CNC मिलिंग – औरंगाबाद येथे २० जागा, वाळुज २० जागा (कालावधी ६ महिने).
(II) आयटीआय उत्तीर्ण (टर्नर फिटर/ मशिनिस्ट/ ग्राईंडर/ टूल अ‍ॅण्ड डाय मेकर/वेल्डर) पात्रता असलेले कोर्सेस (NSQF लेव्हल-५)
(३) अ‍ॅडव्हान्स्ड सर्टिफिकेट कोर्स इन CNC मशिनिंग – औरंगाबाद येथे ५ जागा (कालावधी १२ महिने).
(४) अ‍ॅडव्हान्स्ड सर्टिफिकेट कोर्स इन मशिन मेंटेनन्स – औरंगाबाद येथे ५ जागा (कालावधी १२ महिने).
(III) डिग्री/ डिप्लोमा (मेकॅनिकल/ प्रोडक्शन/ ऑटोमोबाईल इंजीनिअरींग) पात्रता असलेले कोर्सेस (NSQF Level ६)
(५) पोस्ट डिप्लोमा इन टूल डिझाईन अ‍ॅण्ड CAD/ CAM: औरंगाबाद – १० जागा, कोल्हापूर – ११ जागा (कालावधी १२ महिने).
(६) पोस्ट डिप्लोमा इन टूल अ‍ॅण्ड डाय मॅन्युफॅक्चिरग – औरंगाबाद येथे ५ जागा (कालावधी १२ महिने).
(७) मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन CAD/ CAM: प्रवेश क्षमता – ११८ (औरंगाबाद – २५ जागा, कोल्हापूर – २८ जागा, नागपूर – २५ जागा, पुणे – २५ आणि वाळुज – १५ जागा) (कालावधी ६ महिने).
(८) मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन टूल डिझाईन – पुणे – १० जागा (कालावधी ६ महिने).
(९) मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर एडेड टूल इंजीनिअरींग – नागपूर – १० जागा, पुणे – २ जागा (कालावधी ६ महिने).
(कश्) डिग्री/ डिप्लोमा (मेकॅनिकल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रमेंटेशन इंजीनिअरींग) पात्रता असलेले कोर्सेस –
(१०) पोस्ट डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स – औरंगाबाद – ५ जागा (कालावधी १२ महिने) (ठरदा छी५ी’ ६).
(११) मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन ऑटोमेशन अँड प्रोसेस कंट्रोल – औरंगाबाद – २० जागा (कालावधी ६ महिने) ((NSQF Level५).
(१२) अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन मेंटेनन्स अँड ऑटोमेशन – औरंगाबाद – २० जागा (कालावधी ६ महिने) ((NSQF Level ५).

(V) डिग्री/ डिप्लोमा सिव्हील इंजीनिअरींग पात्रता असलेले कोर्स –
(१३) अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन स्ट्रक्चरल डिझाईन अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस – प्रवेश क्षमता – ५३ (औरंगाबाद – २५ जागा, कोल्हापूर – २८ जागा) (कालावधी ६ महिने) (NSQF Level ५).
(VI) १२ वी, २ वर्ष कालावधीचा आयटीआय, डिप्लोमा/डिग्री (कोणतीही शाखा) उत्तीर्ण पात्रता असलेले कोर्स (NSQF Level ५) –
(१४) रुम एअर कंडिशनर अ‍ॅण्ड होम अ‍ॅप्लायन्सेस – प्रवेश क्षमता – २५ (औरंगाबाद) (कालावधी ४ महिने).
वरील सर्व कौशल्य विकास प्रशिक्षण हे नि:शुल्क असून ते आयजीटीआर, औरंगाबाद या राष्ट्रीय पातळीवरील भारत सरकारच्या संस्थेद्वारे औरंगाबाद व या संस्थेच्या पुणे, नागपूर, कोल्हापूर व वाळुज उपकेंद्रात देण्यात येईल.
सदर प्रशिक्षण हे अनिवासी ((non- residential) असून प्रशिक्षणा दरम्यान राहणे व जेवण्याची व्यवस्था प्रशिक्षणार्थ्यांस स्व-खर्चाने करावी लागेल.
वयाची अट – १८ ते ३५ वर्षे.

निवड पद्धती – प्राप्त अर्जामधून निकषांच्या आधारे अर्जाची छाननी करून निवडक उमेदवारांना पात्रता प्रवेश परीक्षा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल. पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
उमेदवारांनी ज्या प्रशिक्षण केंद्राची निवड केली आहे. त्याच प्रशिक्षण केंद्रावर त्यांची पात्रता प्रवेश परीक्षा, मुलाखत व कागदपत्र पडताळणी दि. ३ ऑगस्ट २०२३ रोजी करण्यात येईल. पात्रता प्रवेश परीक्षा इंग्रजी, गणित व सामान्य ज्ञान या विषयांवर आधारित राहील.
प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी आयजीटीआर व सारथीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. http:// www. igtr- aur. org प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर उमेदवारांस प्रशिक्षणास गैरहजर राहता येणार नाही अथवा प्रशिक्षण मध्येच सोडून जाता येणार नाही.
उमेदवारास नॉन-क्रिमी लेयर सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहे.
ज्या उमेदवाराकडे जातीचे प्रमाणपत्र नसेल अशा उमेदवारांची जात ही शाळा/ महाविद्यालय सोडल्याच्या दाखल्यावरून (T.C./ L.C.) ग्राह्य धरण्यात येईल.

ज्या उमेदवारांना आयजीटीआर, औरंगाबाद, पुणे, नागपूर, कोल्हापूर व वाळुज यापैकी जिथे प्रशिक्षण घ्यायचे आहे, त्यांनी त्याच सेंटरच्या खाली दिलेल्या QR code किंवा संस्थेच्या http:// www. igtr- aur. org या संकेतस्थळावर दि. ३१ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत. प्रशिक्षण सुरू होण्याची तारीख ७ ऑगस्ट २०२३.
अर्जासोबत जोडावयाची/अपलोड करावयाची कागदपत्रे : (१) विहीत नमुन्यातील व फोटोसहीत पूर्ण भरलेला अर्ज, (२) प्रशिक्षणानुसार आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्र (१० वी, १२ वी, आयटीआय, डिप्लोमा, डिग्री इ.), (३) जातीचे प्रमाणपत्र/ शाळा सोडल्याचा दाखला, (४) नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र, (५) जन्म दाखला, (६) महाराष्ट्र राज्याचा रहिवासी प्रमाणपत्र, (७) आधारकार्ड, (८) स्वत:चा फोटो, (९) स्वत:ची सही, (१०) मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट.

GTR औरंगाबाद संस्थेचा पत्ता – MSME Technology Center, Indo German Tool Room, Aurangabad. p-31, MIDC, Chikhalthan Industrial Area, Phone No. ०२४० – २६१०१०० Ext. ४११, ४३०, ४३१, ४३२, Mobile No. ९३७३१६१२५२, ९३७३७६१२५३
पुणे उपकेंद्र IGTR Extension Centres – IGTR – MSME Dr CAD/ CAM Training Centre, Pune- I, Near PMT Workshop, Swargate, Pune – ४११ ०३७, Phone No. ००९१-०२० २४४४०८६१, Mobile No. ९३७३०५०१०१.
नागपूर उपकेंद्र – Indo German Tool Room, Aurangabad, Extension Centre, Nagpur P-१४२, MIDC Hingna, Nagpur – ४४० ०२८, Phone No. ०७१०४ – २९७१३६ ,Mobile No. ९०७५०९५५५२.
कोल्हापूर उपकेंद्र – Advanced Technology Centre, IGTR, Aurangabad Extension Centre, Kolhapur, Shivaji University, Vidya Nagar, Kolhapur – ४१६ ००४. Mobile no. ९४२०३९०२३८, ८६९८१६५८२८, ९१६८२२४९४८.
वाळुज उपकेंद्र – IGTR Aurangabad Extension Centre (Waluj), Plot No. P- १७९, MIDC Industrial Area, Waluj , ४३१ १३६, Aurangabad. Mobile No. ७८७५४३३४०, ९३७३१६१२५६.

बृहन्मुंबई महानगरपालिका ( MCGM), सार्वजनिक आरोग्य विभाग, मुरली देवरा महापालिका नेत्र रुग्णालय, स्कूल ऑफ ऑप्टोमेट्री येथे ‘ऑप्टोमेट्री पदविका’ अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता प्रवेश.
प्रवेश क्षमता – २०. कोर्सचा कालावधी – २ वर्ष (४ सेमिस्टर्स) (Advt. No. PRO/1028/ ADV/2023-24) /1028/ ADV/2023-24) हा कोर्स महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याशी संलग्न आहे. अभ्यासक्रमाचे माध्यम – इंग्रजी
अभ्यासक्रमाचे शुल्क : प्रति सेमिस्टर रु. १५,०००/- (२ वर्षांकरिता एकूण रु. ६०,०००/-). पदविका प्रमाणपत्र बृहन्मुंबई महानगरपालिका/ एमयूएचएसद्वारे प्रदान केले जाईल.

प्रवेशासाठी पात्रता : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रसहीत १२ वी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण.
अर्ज मिळण्याचे ठिकाण : स्कूल ऑफ ऑप्टोमेट्री, मुरली देवरा महापालिका नेत्र रुग्णालय, सहावा मजला, मौलाना शौकतअली रोड, दुर्गादेवी उद्यानासमोर, ग्रँटरोड (पूर्व), मुंबई – ४०० ००८.
अर्जाचे शुल्क : रु. ५००/- देवून अर्ज प्राप्त करता येतील. (सोमवार ते शुक्रवार सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० पर्यंत)
अर्ज प्रपत्रांची विक्री : १८ जुलै २०२३ पासून.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्ज सादरीकरणाचा अंतिम दिनांक : ४ ऑगस्ट २०२३
सूचना फलकावर गुणवत्ता यादीचे प्रकाशन : ८ ऑगस्ट २०२३.
कागदपत्रांची छाननी : १० ऑगस्ट २०२३.
अंतिम गुणवत्ता यादीचे प्रकाशन : १४ ऑगस्ट २०२३.
ऑप्टोमेट्रीचे वर्ग सुरू होण्याचा दिनांक : १७ ऑगस्ट २०२३.