News Flash

असीम मुनीर पाकिस्तानी ISI चे नवीन बॉस

आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखपदी लेफ्टनंट जनरल असीम मुनीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखपदी लेफ्टनंट जनरल असीम मुनीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विभागाकडून ही माहिती देण्यात आली. मुनीर याआधी लष्कराच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख होते. नुकतीच त्यांना लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्या अध्यक्षतेखालील आर्मी प्रमोशन बोर्डाने लेफ्टनंट जनरलपदी बढती दिली होती.

ते लेफ्टनंट जनरल नावीद मुख्तार यांची जागा घेणार आहेत. मुख्तार डिसेंबर २०१६ पासून आयएसआयचे प्रमुख होते. असीम मुनीर कमांडरही होते. पाकिस्तानी लष्करातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पाकिस्तानात लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार सत्तेवर असले तरी मुख्य सत्ताकेंद्र हे लष्कर आणि आयएसआयच आहे.

पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय धोरण आणि निर्णयांमध्ये आयएसआयची भूमिका महत्वाची असते. आतापर्यंत भारतात झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये आयएसआयचा हात आहे. काश्मीरसह भारताच्या अन्य भागांमध्ये अस्थितरता कशी निर्माण करता येईल त्यासाठी आयएसआयचे नेहमीच प्रयत्न सुरु असतात. पाकिस्तानचा मुख्य शत्रू भारत असून भारताला डोळयासमोर ठेऊन आयएसआय धोरण ठरवते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2018 5:38 pm

Web Title: asim munir new head of pakistans isi
टॅग : Isi,Pakistan
Next Stories
1 तुषार मेहता भारताचे नवे महाधिवक्ता
2 १५ लाखांच्या आश्वासनाबाबत काहीच बोललो नाही – नितीन गडकरी
3 #MeToo: एम. जे. अकबर यांनी राजीनामा द्यावा : काँग्रेस
Just Now!
X