दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार घेत असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे रुग्णालयातून लोकांना धमकावत आहेत, असा खळबळजनक आरोप गोवा काँग्रेसचे प्रवक्ते ए. चेल्लाकुमार यांनी केला आहे. त्याचबरोबर पर्रिकर यांच्या मेडिकल बुलेटिनची मागणीही त्यांनी केली. पर्रिकर एम्समध्ये स्वादूपिंडाच्या कर्करोगावर उपचार घेत आहेत.


चेल्लाकुमार म्हणाले, पर्रिकर रुग्णालयात असतील तर त्यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी मी प्रार्थना करतो. मात्र, आम्हाला माहिती मिळाली आहे की, आपण रुग्णालयातील आपल्या खोलीतून लोकांना फोन करुन त्यांना धमकावत आहात. काँग्रेसने हा आरोप अशा वेळी लागला आहे, ज्यावेळी गोव्यातील भाजपाचा सहकारी पक्ष गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी म्हटले की, पर्रिकर यांनी त्यांच्याशी गुरुवारी प्रशासकीय बाबींवर चर्चा केली.

चेल्लाकुमार म्हणतात की, मुख्यमंत्री पर्रिकरांनी १.४४ लाख कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्याप्रती मौन बाळगले आहे. त्यांनी लोकांना आश्वस्त करायला हवे की, जर ते या घोटाळ्यात दोषी आढळले तर आपली सर्व संपत्ती जप्त करण्यात यावी. गोव्यातील या खाण घोटाळ्याच्या तपासाची जबाबदारी गोव्याच्या लोकायुक्तांवर आहे.

चेल्लाकुमार पुढे म्हणाले, मी आता ईश्वराकडे प्रार्थना करतो की लवकरात लवकर पर्रिकरांना बरं वाटू दे. त्यांनी दीर्घायुष्य लाभो. मात्र, त्यांना आठवण करुन देणे हे माझे कर्तव्य आहे की, तुम्ही ज्याप्रमाणे माजी मंत्र्यांविरोधात कारवाई केली होती. सर्व भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये आपण तक्रार दाखल करता. इतकेच नव्हे तर आपण त्यांच्या संपत्याही जप्त केल्या आहेत. आता अशीच वेळ आपल्यावर आली आहे.