News Flash

CoronaVirus : अमेरिकेसह या १३ देशांसाठी भारत बनला ‘संजिवनी’; लाखो गोळ्या पाठवणार

सरकारने दिली मंजुरी

संग्रहित छायाचित्र

ज्या औषधांसाठी अमेरिकेने भारताला धमकी वजा इशारा दिला होता, ती हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधे १३ देशांसाठी पाठवण्याची परवानगी भारत सरकारने दिली आहे. विशेष म्हणजे त्यात अमेरिकेचाही समावेश आहे.

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन पाठवण्यात येणाऱ्या देशांमध्ये अमेरिका, स्पेन, जर्मनी, बहरिन, ब्राझिल, नेपाळ, भूतान, श्रीलंका, अफगाणिस्तान, मालदिव आणि बांगला देश या १३ देशांचा समावेश आहे. अमेरिकेने भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या ४८ लाख गोळ्या मागितल्या होत्या. भारताने ३५.८२ लाख गोळ्या पाठवण्यास मंजुरी दिली आहे.

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन म्हणजे काय ?
हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या तोंडावाटे घेण्याच्या गोळ्या आहेत त्यांचा वापर स्वप्रतिकारशक्ती कमी झाल्याने होणाऱ्या रोगात केला जातो. मलेरियाविरोधात वापरल्या जाणाऱ्या क्लोकोक्विन या गोळीच्याच प्रजातीचे हे औषध आहे. पण त्याचा वापर हृदयाच्या संधीवातावर केला जातो.

औषधाचे वैद्यकीय पुरावे काही आहेत का ?
दी लॅन्सेट ग्लोबल हेल्थ या नियकालिकातील संशोधन निबंधानुसार या औषधाने प्राथमिक पातळीवर तरी सार्स सीओव्ही २ या विषाणूला मारण्याचे गुणधर्म दाखवले आहेत, या औषधामुळे शरीरात एका टप्प्यावर विषाणूंची जी संख्या वाढत जाऊन ते मोकाट सुटतात त्या प्रक्रियेला आळा घातला जातो. भारतात या औषधाच्या वापराबाबत भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने काही नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार प्रायोगिक पातळीवर हे औषध करोनावर प्रतिबंधात्मक पातळीवर गुणकारी आहे. लक्षणे न दाखवणारे आरोग्य कर्मचारी तसेच संपर्कात आलेले पण लक्षणे न दाखवणारे रूग्ण यांच्यात या औषधाचा वापर करावा अशी शिफारस करण्यात आली. भारताच्या करोना प्रतिबंधक दलाने या औषधाचा वापर तातडीच्या परिस्थितीत मर्यादित पातळीवर करावा असे म्हटले आहे.

या औषधाचे भारतातील उत्पादक कोण आहेत ?
हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाची बाजारपेठ फेब्रुवारी २०२० पर्यंत १५२.८० कोटी रूपयांची होती. अनेक देश हे औषध भारताकडून घेतात. मुंबईच्या आयपीसीए लॅबोरेटरीजकडून या औषधाचे ८२ टक्के उत्पादन होते. त्यांची एचसीक्यूएस व एचवायक्यू ही उत्पादने आहेत. या कंपनीचे ८० टक्के औषध निर्यात होते. अहमदाबाद येथील कॅडिला हेल्थकेअरचा वाटा आठ टक्के आहे तर वॉलेस फार्मास्युटिकल्स, टॉरेंट फामॉस्युटिकल्स, ओव्हरसीज हेल्थकेअर प्रा. लि. यांचा वाटा खूप कमी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2020 5:48 pm

Web Title: india approves release of hcq drug to 13 countries pkd 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 हल्लेखोरांनी कापलेला हात घेऊन पोलीस अधिकारी गाडीवर बसला आणि म्हणाला, हॉस्पिटलमध्ये चला…
2 लॉकडाउनपेक्षाही भयंकर; बाल लैंगिक शोषण आणि हिंसाचाराच्या तक्रारींचा खच
3 करोनातील प्रेरणादायी कहाणी : मुलाला जन्म देऊन २२ दिवसांतच ड्युटीवर हजर झाल्या आयुक्त
Just Now!
X