News Flash

जे. पी. नड्डा होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष, १९ फेब्रुवारी रोजी निवड प्रक्रिया

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे ते निकटवर्तीय मानले जातात

संग्रहीत

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा होतील हे जवळपास निश्चित मानलं जातं आहे. १९ फेब्रुवारीला यासाठीची निवड प्रक्रिया दिल्लीत पार पडणार आहे. यानंतर जे.पी. नड्डा हे भाजपाचे ११ वे राष्ट्रीय अध्यक्ष होतील हे निश्चित मानलं जातं आहे. सध्या जे. पी. नड्डा हे भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. ते गृहमंत्री आणि सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणं हे निश्चित मानलं जातं आहे.

कोण आहेत जे. पी. नड्डा?
जे. पी. नड्डा हे मागील मंत्रिमंडळात समाविष्ट होते. कमीत कमी प्रकाशझोतात राहून वेगाने कामं करून घेण्याचं कौशल्य नड्डा यांच्यात आहे. आयुष्मान भारत, मोदी केअर या योजना आणण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. अमित शाह यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. उत्तर प्रदेशात मतांची टक्केवारी ५० टक्के यावी अशी अपेक्षा अमित शाह यांनी नड्डा यांच्याकडून केली होती. नड्डा यांनी ४९.६ टक्के टक्केवारी आणून दाखवली.

जगत प्रकाश नड्डा यांचा जन्म पाटणा या ठिकाणी एका ब्राह्मण कुटुंबात झाला. पाटणा येथील सेंट झेवियर्स विद्यापीठातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर हिमाचल प्रदेशातून त्यांनी LLB ची डिग्री घेतली. विद्यार्थीदशेत असताना जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतही नड्डा यांनी सहभाग नोंदवला होता. हिमाचल प्रदेशात शिक्षण घेताना ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. १९८४ मध्ये स्टुंडट्स फेडरेशन ऑफ इंडियाचा पराभव अभाविपने केला होता. ज्यानंतर हिमाचल प्रदेशात पहिल्यांदा विद्यार्थी युनियनचे अध्यक्षपद जे. पी नड्डा यांनी भुषवलं.

१९८६ ते १९८९ या कालावधीत जे. पी. नड्डा हे अभाविपचे राष्ट्रीय सचिव होते. त्यानंतर भारतीय युवा मोर्चा अर्थात भाजयुमोच्या अध्यक्षपदीही त्यांची नियुक्ती करण्यात आली. वयाच्या ३३ व्या वर्षी त्यांनी हिमाचलमधून आमदारकीची निवडणूक लढवली आणि जिंकून आले. त्यानंतर १९९८ आणि २००७ या दोन्ही वर्षातही त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली आणि जिंकली. या सगळ्या प्रवासानंतर नितीन गडकरी यांच्यामुळे जे. पी. नड्डा यांचा प्रवेश भाजपाच्या राष्ट्रीय राजकारणात झाला. २०१२ मध्ये त्यांनी राज्यसभा लढवली. त्यानंतर ते अमित शाह यांचे विश्वासू सहकारी झाले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2020 7:57 pm

Web Title: j p nadda likely to become next bjp chief scj 81
Next Stories
1 ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी यांच्यात CAA,NRC आणि NPR वर चर्चा
2 “पाकिस्ताननही CAA सारखं पाऊल उचलून इथल्या पीडितांना घेऊन जावं”
3 …तर ‘पीओके’ देखील आपलाच असायला हवा : लष्करप्रमुख नरवणे
Just Now!
X