समीर वानखेडे ऐवजी आता ‘या’ अधिकाऱ्याच्या हाती आर्यन खान केसचा तपास!

एनसीबीनं आज मोठा निर्णय घेतला आहे.

(संग्रहीत छायाचित्र)

राज्यभरात मागील काही दिवसांमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात, आर्यन खान सोबत चर्चांच्या केंद्रस्थानी राहिलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याकडून क्रुझ ड्रग्ज केससह सहा प्रकरणाचा तपास आज काढून घेण्यात आल्याचं समोर आलं. या प्रकरणांचा तपास आता एनसीबीचे एक केंद्रीय पथक करणार आहे, ज्याचे नेतृत्व एनसीबी अधिकारी संजय सिंह करणार आहेत.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर जोरदार टीका सुरू केली होती. समीर वानखेडे या प्रकरणाचा तपास हेतुपुरस्सर विशिष्ट पद्धतीने करत असल्याची देखील टीका नवाब मलिक यांनी केली होती. त्यानंतर आता एनसीबीनं मोठा निर्णय घेतला आहे.

एनसीबीची नवी टीम मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या केसचा देखील समावेश आहे. समीर वानखेडे यांच्यावर वसुलीचे आरोप झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मोठी बातमी! समीर वानखेडेंकडून आर्यन खान प्रकरणाचा तपास काढला! नवाब मलिक म्हणतात, “ही तर फक्त…!”

एएनआयच्या माहितीनुसार, एनसीबीचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन म्हणाले, आमच्या झोनच्या एकूण ६ प्रकरणांची चौकशी आता दिल्लीच्या एनसीबी पथकांकडून केली जाईल, ज्यामध्ये आर्यन खानचे प्रकरण आणि इतर ५ प्रकरणांचा समावेश आहे. हा प्रशासकीय निर्णय होता.

आर्यन खान प्रकरणाचा तपास काढुन घेतल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

तर, समीर वानखेडे यांनी एएनआयला सांगितले की, “मला तपासातून वगळण्यात आलेले नाही. या प्रकरणाचा तपास कोणत्या तरी केंद्रीय एजन्सीमार्फत व्हावा, अशी मी न्यायालयात याचिका देखील केली होती. त्यामुळे आर्यन प्रकरण आणि समीर खान प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबीची एसआयटी करत आहे. दिल्ली आणि मुंबईच्या एनसीबी संघांमध्ये हा एक समन्वय आहे.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aryan khan case to be investigated by sanjay singh instead of sameer wankhede msr

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी