मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यातील दारूबंदीवर बोलावली उच्चस्तरीय बैठक

विषारी दारू पिऊन मृत्यू होत असल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बिहार सरकार कडक निर्णय घेण्याच्या भूमिकेत

Nitish-Kumar
(प्रातिनिधिक छायाचित्र)

बिहामध्ये दिवाळीच्या एक दिवाळीच्या एक दिवस अगोदरपासून एक पाठोपाठ एक विषारी दारूच्या घटना आणि ४० पेक्षा अधिक जणांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कडक पावलं उचलण्यास सुरूवात केल्याचं दिसत आहे. तीन दिवस अगोदरच त्यांनी राज्यात दारूबंदीला आणखी प्रभावीपणे लागू करण्यासाठी मोठं अभियान चालवण्याचे विधान केलं होतं. आता त्यांनी १६ नोव्हेंब रोजी या संबंधी चर्चेसाठी एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे. असं मानलं जात आहे की बैठकीत मुख्यमंत्री दारू माफियांविरोधात मोठी कारवाईची घोषणा करू शकतात.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी सांगितलं की, विषारी दारूच्या घटनांमधील दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल. त्यांनी म्हटलं की दारूबंदीतून बऱ्याच प्रमाणात या समस्येवर अंकुश लावला जाऊ शकतो. काही जणच यामध्ये अडकलेले आहेत, त्यांना जागृत देखील केलं जाईल. विषारी दारू प्रकरणात जबाबदार आढळलेल्या अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. तसेच, त्यांनी अधिकाऱ्यांना हे देखील विचारलं की जिल्हा ओलांडून तस्कर कसे काय येतात? आणि दारूवर कडक बंदीचे आदेश दिले.

“मी वारंवार सांगितलंय तुम्ही चुकीची गोष्ट प्यायल्यानंतर…”, बिहारमध्ये २४ जणांच्या मृत्यनंतर नितीश कुमार यांची प्रतिक्रिया

याच दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दारू व्यवसाय करणाऱ्यांविरोधात पोलिसांचा कठोर पवित्रा दिसत आहे. अनेक जिल्ह्यात अभियान चालवून पोलीस सातत्याने दारू भट्ट्या उध्वस्त करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chief minister nitish kumar convened a high level meeting on alcohol ban in the state msr

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या