OTP Messages : ऑनलाइन फसवणुकीच्या घटना सातत्याने वाढताना पाहायला मिळत आहेत. अनेकवेळा ऑनलाइन फसवणुकीच्या घटनामध्ये बनावट ओटीपीचा (OTP) वापर करत फसवणूक केली जाते. यामुळे अनेकवेळा लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावं लागतं. लोकांचं नुकसान होऊ नये म्हणून योग्य ती पावलं आता उचलण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवरच आता १ डिसेंबरपासून ओटीपीच्या नियमांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अनेक नागरिकांना बनावट ओटीपी पाठवून ऑनलाइन फसवणूक होण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी आता भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण काही बदल करत महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. ग्राहकांची फसवणूक होऊ नये आणि ग्राहकांची सुरक्षा वाढवण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) नवीन नियम लागू करण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे आता १ डिसेंबरपासून ओटीपी मेसेज मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Anurag Dubey: “त्यांना सांगा की, आम्ही असा आदेश देऊ की, आयुष्यभर लक्षात ठेवतील”, न्यायालयाने पोलिसांना का फटकारले?

दरम्यान, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (TRAI) माध्यमातून होणाऱ्या नव्या बदलामुळे जिओ, एअरटेल, व्होडाफोन आणि बीएसएनएल या सारख्या दूरसंचार कंपन्यांच्या संदेशावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, हा परिणाम एक ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांपासून वाचवण्यासाठी एका उपक्रमाचा एक भाग असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

OTP मेसेज बंद होईल का?

अनेकदा एखाद्या OTP मेसेजमुळे लोकांची बँक खाती देखील रिकामी होतात, म्हणजे खात्यातून पैसे कट होतात. मात्र, अशा प्रकारच्या फसवणुकीच्या गोष्टींना आळा घालण्यासाठी आता भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने दूरसंचार कंपन्यांना संदेश ट्रेसिबिलिटी प्रदान करण्यास सांगितलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की दूरसंचार कंपन्यांना संदेश कुठून तयार झाला आहे? हे शोधण्यासाठी व्यवस्था करावी लागेल. त्यामुळे दूरसंचार कंपन्यांनी याची व्यवस्था केली नाही किंवा यासंदर्भातील नियमांचं पालन केलं नाही तर वापरकर्त्यांना ओटीपी मिळणं बंद होऊ शकतं किंवा ओटीपी मिळण्यास उशीर होऊ शकतो.