RSS Chief Mohan Bhagwat: “भारतात राहणारी प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे आणि सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे”, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. कोणालाही पूजा करण्याची पद्धत बदलण्याची गरज नाही, कारण सर्व प्रार्थना एकाच ठिकाणी जातात, असंही ते म्हणाले आहेत. छत्तीसगडमधील सरगुजा जिल्ह्यातील अंबिकापूरमध्ये आयोजित स्वयंसेवकांच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

…यामुळे भागवत मशीद-मदरशामध्ये जात आहेत, तर मोदीही लवकरच घालणार ‘टोपी’ – दिग्विजय सिंह

“प्राचीन काळापासून विविधतेत एकता हे भारताचं वैशिष्ट्य आहे. सर्वांना सोबत घेऊन चालणे, हा हिंदूत्वाचा विचार आहे”, असेही भागवत यांनी म्हटले आहे. “भारतात राहणारी प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे, हे आम्ही १९२५ पासून म्हणत आहोत. जी व्यक्ती भारताला आपली आई, मातृभूमी मानते, जी व्यक्ती भारतातील विविधतेतील एकता या संस्कृतीत जगायला तयार आहे, मग त्या व्यक्तीची भाषा, आहार आणि प्रथा-परंपरा कुठलीही असो, ती व्यक्ती हिंदू आहे”, असे भागवत म्हणाले आहेत.

प्रभू श्रीराम यांच्याकडून सर्वांनी प्रेरणा घ्यावी, समाजातील प्रत्येक घटकाला जोडण्याचे काम करावे – सरसंघचालक मोहन भागवत

प्रत्येक भारतीय ४० हजार वर्ष जुन्या अखंड भारताचा भाग

देशातील प्रत्येकाचा डीएनए आणि पूर्वज एक आहे, असे भागवत यांनी म्हटले आहे. “भारतात विविधता असूनही आपण सर्व एकसमान आहोत. प्रत्येक भारतीय ४० हजार वर्ष जुन्या अखंड भारताचा भाग आहे. प्रत्येकाने आपली श्रद्धा आणि पूजा करण्याची पद्धत जोपासली पाहिजे. दुसऱ्यांच्या आयुष्यातील या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करू नये, अशी शिकवण आपल्या पूर्वजांची आहे”, असे प्रतिपादन भागवत यांनी केले आहे.

“बायकांना बोलल्यावर देवेंद्रभाऊंना जणूकाही…” सुषमा अंधारेंचं फडणवीसांसह गुलाबराव पाटलांवर टीकास्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आपली संस्कृती सर्वांना जोडणारी आहे. आपण अंतर्गत कितीही भांडलो तरीही संकटाच्या वेळी एकत्र येतो. देशावर आलेल्या करोना संकटांचा आपण एकजुटीनं सामना केला” असेही भागवत यावेळी म्हणाले.