भारतात सध्या कार वापरणाऱ्यांची संख्या खूप वाढतेय. भारतात मोठ्या प्रमाणात हिवाळ्याच्या दिवसात लोक लाँग ड्राईव्हला किंवा बाहेर फिरण्याचा प्लॅन करतात. मात्र, प्रवासादरम्यान कधीही कोणतीही अडचण निर्माण होऊ शकते. तुमची सुरू असलेली कार कोणत्याही कारणास्तव कधी बंद पडेल काही सांगता येणार नाही. त्यामुळे तुमच्या कारमध्ये टायर पंक्चर रिपेअर किट असणे आवश्यक आहे. पण हे टायर पंक्चर रिपेअर किटचा उपयोग कसा करता येईल हे तुम्हाला माहिती आहे का? आज आम्ही तुम्हाला टायर पंक्चर रिपेअर किट कसे काम करते याविषयी माहिती देणार आहोत.

कारमध्ये टायर पंक्चर रिपेअर किट असणे आवश्यक

कारमध्ये टायर इन्फ्लेटरसह पंक्चर रिपेअर किट असायलाच हवं. पंक्चर रिपेअर किट नेहमी कारमध्ये ठेवायला हवं. हल्ली वाहनांमध्ये ट्यूबलेस टायर्स उपलब्ध आहेत, या टायर्सचं पंक्चर काढणं (ठीक करणं) सोपं असतं. यासाठी किट असणं आवश्यक असतं. हे किट कठीण काळात उपयोगी पडेल. लाँग ड्राईव्हला गेल्यावर किंवा खेड्यांमधील रस्त्यांवर गॅरेज उपलब्ध नसतात, अशा वेळी तुमची कार पंक्चर झाली तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. त्यामुळे पंक्चर रिपेअर किट सोबत असणं कधीही उत्तम.

(आणखी वाचा: रस्त्याच्या कडेला असलेले माइलस्टोन्स वेगवेगळ्या रंगांचे का असतात? काय आहे यामागील गुपित, वाचा सविस्तर )

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टायर पंक्चर रिपेअर किटचा कसा वापर कराल?

  • प्लग स्ट्रिप तयार करण्यासाठी छिद्र साफ करण्यासाठी रीमिंग टूल वापरा.
  • त्यानंतर, तुम्ही प्लग स्ट्रिप इन्सर्शन टूलच्या अर्ध्या मार्गावर ठेवावी.
  • पुन्हा, पंक्चरमध्ये इन्सर्टेशन टूल टाकण्याची प्रक्रिया गुळगुळीत करण्यासाठी वंगण सामग्री वापरली जाणे आवश्यक आहे.
  • टायरच्या पृष्ठभागाच्या बाहेर प्लग पट्टीचा एक छोटासा भाग ठेवण्याचे लक्षात ठेवा.
  • नंतर, टायरच्या छिद्रात पट्टी अडकण्यासाठी इन्सर्शन टूल पटकन बाहेर काढा.
  • प्लग स्ट्रिप टायरमधील भोक व्यवस्थितपणे कव्हर करते.
  • शेवटी, गुळगुळीत ड्राइव्हसाठी टायरच्या पृष्ठभागावरील अतिरिक्त प्लग पट्टी कापून टाका.