What is Internet Movie Database : गेल्या काही वर्षांमध्ये ओटीटी माध्यमांचं महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. ओटीटी अ‍ॅप्सवर दर आठवड्याला विविध कलाकृती प्रदर्शित केल्या जातात. जवळपास प्रत्येक टेलिव्हिजन वाहिन्यांनी आपले स्वतंत्र ओटीटी अ‍ॅप्स देखील सुरू केले आहेत. याशिवाय थिएटरमध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट सुद्धा काही काळाने ओटीटीवर प्रदर्शित होतात, त्यामुळे ओटीटीवर प्रत्येक भाषेतील विवध प्रकारचा कंटेट उपलब्ध असताना नेमकं काय पाहायचं असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. अशावेळी अलीकडच्या काळातील तरुणपिढी लगेच संबंधित सीरिज, चित्रपट अथवा टीव्ही शोला IMDb रेटिंग किती आहे याची पडताळणी करते.

आयएमडीबी ( IMDb ) म्हणजे काय?

आयएमडीबी म्हणजेच ‘इंटरनेट मूव्ही डेटाबेस’. IMDb हा सध्याच्या मनोरंजनविश्वातील सर्वाधिक लोकप्रिय असा मीडिया डेटाबेस आहे. याठिकाणी सिनेप्रेमींना चित्रपट, टेलिव्हिजन शो, व्हिडीओ गेम्स, रिअ‍ॅलिटी शो आणि ओटीटी कंटेट संबंधित सगळी माहिती उपलब्ध होते. कथानकाचा सारांश, कलाकारांची नावं व वैयक्तिक माहिती, संबंधित कलाकारांनी आजवर कोणत्या प्रोजेक्टमध्ये काम केलंय याविषयीची माहिती, चित्रपटाचा क्रू, ट्रेलर, रिलीज तारखा, समीक्षकांचं मत अशाप्रकारच्या माहितीचा यात समावेश आहे.

How to Read WhatsApp messages secretly without Letting the sender know
सेंडरला कळू न देता तुम्ही गुप्तपणे वाचू शकता व्हॉट्सअप मेसेज; जाणून घ्या, कसे?
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
व्यक्तिवेध : बियॉन्से कार्टर
Fenado AI Builds apps & websites in minutes
Fenado AI : आता कोडिंगची आवश्यकता नाही! तुमच्या व्यवसायासाठी ‘अशी’ बनवा वेबसाईट; शार्क टँकच्या जजचा नवा उपक्रम
How To Use Roti Checker AI
AI For Roti : महिलांनो! आता एआय घेणार तुमच्या स्वयंपाकाची परीक्षा; पोळीला देणार गुण
1 February 2025 Horoscope In Marathi
माघी गणेश जयंती, १ फेब्रुवारी पंचांग: बाप्पाच्या कृपेने अडथळ्यातून निघेल मार्ग; कोणाला घेता येईल संधीचा लाभ तर कोणावर होईल सुखाचा वर्षाव
Who does fact-checking
फॅक्ट चेकिंग नेमकं कोण करतं? फॅक्ट चेकर्स कसे काम करतात? जाणून घ्या सविस्तर….
how to get account statement information through call
कॉलद्वारे अकाउंट स्टेटमेंटची माहिती कशी मिळवावी? जाणून घ्या ‘या’ पाच स्टेप्स

हेही वाचा : “माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”

आयएमडीबीची ( IMDb ) स्थापना १९९० मध्ये ‘दोज आइज’ या नावाने करण्यात आली होती. इंग्रजी सिनेप्रेमी आणि संगणक प्रोग्रामर कर्नल नीडहॅम यांनी वैयक्तिक डेटाबेस तयार केला होता. यानंतर आयएमडीबी १९९८ मध्ये Amazon.com ने विकत घेतलं. सध्या, बॉलीवूडपासून ते हॉलीवूडपर्यंत अनेक चित्रपट, टीव्ही शो, वेब सीरीजना IMDb वर १ ते १० दरम्यान रेटिंग दिलं जातं. या रेटिंगनुसार, संबंधित चित्रपट किंवा वेब सीरीज यशस्वी की फ्लॉप आहेत हे सिनेप्रेमींकडून ठरवलं जातं. याशिवाय चित्रपट समीक्षक सुद्धा यावर आपलं मत नोंदवतात. आयएमडीबीकडे टॉप २५० चित्रपटांची यादी आहे, ज्यामध्ये २२ फेब्रुवारी २०२२ पर्यंत फ्रँक डाराबोंट दिग्दर्शित ‘द शॉशँक रिडेम्पशन’ चित्रपट पहिल्या क्रमांकावर होता.

आयएमडीबीवर सगळे युजर्स माहिती वाचू शकतात मात्र, माहिती लिहिण्यासाठी किंवा रेटिंग देण्यासाठी या साइटवर युजरचं अधिकृत खातं असणं आवश्यक आहे. फक्त नोंदणीकृत वापरकर्तेच चित्रपटांना रेटिंग देऊन माहिती संपादित करू शकतात.

IMDb वापरकर्त्यांना चित्रपटांना १ ते १० च्या स्केलवर रेटिंग देण्याची परवानगी देतं. युजर्स आणि समीक्षकांचे हे सगळे रेटिंग्ज एकत्रित केले जातात आणि त्यानुसार चित्रपट अथवा टीव्ही मालिकांची लोकप्रियता ठरवली जाते. याशिवाय युजर्स IMDb वर त्यांची वॉचलिस्ट सुद्धा बनवू शकतात. ही साइट तुम्ही पाहिलेल्या आणि रेटिंग दिलेल्या प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवते. यावर मार्गदर्शक तत्त्व सुद्धा जारी करण्यात आली आहेत. जेणेकरून संबंधित कंटेट कुटुंबासाठी अनुकूल आहे की नाही, कंटेट हिंसक आहे का? अश्लील तर नाही ना? याचीही माहिती सिनेप्रेमींना मिळते.

हेही वाचा : Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ

दरम्यान, उदाहरण सांगायचं झालं, तर IMDb ने २०२४ मध्ये सर्वाधिक चर्चेत आणि प्रसिद्धीझोतात राहिलेल्या भारतीय कलाकारांची नावं जाहीर केली होती. IMDb ने जगभरातील २५ कोटींहून ( दरमहा ) अधिक दर्शकांनी दिलेल्या मतांच्या आधारे ही क्रमवारी ठरवली होती. गेल्यावर्षी या यादीत तृप्ती डिमरीने पहिलं स्थान मिळवलं होतं. याचप्रमाणे चित्रपटाची लोकप्रियता, तसेच रेटिंग ठरवलं जातं.

Story img Loader