भारतीय रेल्वेने २०४७ पर्यंत नवीन रेल्वेमार्ग तयार करणे तसेच अस्तित्वात असलेल्या रेल्वेमार्गांना अद्ययावत करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. जुन्या रेल्वेमार्गाचे अद्ययावतीकरण करून रेल्वेगाड्या अधिक वेगवान करण्याचे धोरण आखले आहेत. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली असून रेल्वे रुळ आधीपेक्षा अधिक वजनाचे वापरले जात आहेत.

भारतात रेल्वेचा वेग किती असतो?

भारतात सध्या वंदे भारत एक्सप्रेस सर्वाधिक गती असलेली गाडी म्हणून ओळख आहे. ही गाडी १८० किमी प्रतितास धावू शकेल अशी आहे. मात्र, ती गाडी सध्या १३० किमी प्रतितास एवढ्या गतीने काही भागात धावत आहे. ‘गतिमान एक्सप्रेस’ १६० किमी प्रतितास, शताब्दी एक्सप्रेस १५० किमी प्रतितास, मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली तेजस एक्सप्रेस १३० किमी प्रतितास धावू शकते. परंतु या सर्व गाड्यांची सरासरी गती ८० ते ९० किमी प्रतितास आहे.

Kalyan railway station, water,
पावसाचे पाणी उपसण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानक भागात पाणी उपशाचे तीन पंप
Traffic Indiscipline Soars in Nashik, Automatic Signals in nashik, Traffic Police to Enforce Stricter Measure in nashik, e chllan in nashik, e challan, e challan penalty, nashik news,
नाशिक : बेशिस्त वाहनचालकांना लवकरच इ चलनव्दारे दंड
Only 35 percent of BEST fleet is self owned Mumbai
बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या केवळ ३५ टक्के गाड्या
local train passengers, ST buses, mumbai city
मुंबईत रेल्वे प्रवाशांना एसटीचा आधार
cctv camera, Thane station,
ठाणे स्थानकातील ३४ कॅमेरे बंद, निगराणी नसल्याने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Megablack Sunday on Central Railway Mumbai print news
मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लाॅक
Loksatta anvyarth Two wheeler taxi rules Private transport system
अन्वयार्थ: दोनचाकी ‘टॅक्सी’ला हवा नियमांचा ब्रेक…
Electric engine instead of diesel in Rajya Rani Devagiri and Hingoli Janshatabdi
राज्यराणी, देवगिरी, हिंगोली जनशताब्दीला डिझेलऐवजी विद्युत इंजिन

हेही वाचा…मुंबईच्या नाल्यांतील कचरा साफ कसा केला जातो? तरीही दर वर्षी का होते मुंबईची ‘तुंबई’?

पूर्ण वेगाने रेल्वेगाड्या का धावू शकत नाही?

रेल्वेच्या वेगवान वाहतुकीसाठी रूळ अविभाज्य घटक मानला जातो. तो अधिक मजबूत असल्याशिवाय रेल्वेगाडी सुरक्षित आणि वेगाने धावू शकत नाही. आपल्याकडे वेगाने धावणाऱ्या रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत. मात्र, ज्या मार्गावरून गाड्या चालवायच्या आहेत. ते रूळ पूर्ण क्षमतेचे नाहीत. यासोबत सिग्नलिंग यंत्रणा अत्याधुनिक आणि रेल्वे पूल बळकट असणे आवश्यक असते. शिवाय रेल्वे रुळाजवळ लोकवस्ती असायला नको. या सर्व घटकांचा अभाव असल्याने पूर्ण क्षमतेने रेल्वेगाड्या धावू शकत नाहीत.

रेल्वेगाड्यांची गती वाढवणे आवश्यक का?

मानवाचे जीवन अधिक गतिमान झाले आहे. देशाची आर्थिक प्रगती करण्यासाठी वेगवान दळणवळणाचे साधन असणे गरजेचे आहे. दोन शहरांमधील अंतर कमीत-कमी वेळात पूर्ण केल्यास प्रवासाचा वेळ कमी होतो. अप्रत्यक्षपणे देशाच्या प्रगतीत हातभार लागत असतो. तसेच रेल्वे अधिक गतीने धावू लागल्यास मालवाहतूक अधिक वेगाने होणार आहे. त्यामुळे आर्थिक चक्राला गती प्राप्त होणार आहे.

हेही वाचा…भारतीयांच्या आहारात कोरियन पदार्थांची रेलचेल; कोरियन खाद्यपदार्थ भारतात प्रसिद्ध कसे झाले?

वेग वाढण्यासाठी काय केले जात आहे?

भारतीय रेल्वेने गाड्यांचा वेग वाढवण्याकरिता पावले टाकली आहेत. त्यासाठी नवीन रेल्वेमार्ग टाकण्यात येत आहे. तसेच जुन्या मार्गांवरचे रूळ बदलण्यात येत आहेत. त्याऐवजी अधिक वजनाचे रूळ टाकण्यात येत आहेत. टप्प्याटप्प्याने सर्व महत्त्वाच्या मार्गावरील रुळांची क्षमता वाढण्यात येत आहे. याशिवाय अधिक वजनाचे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि पुलांचे मजबुतीकरण केले जात आहे. २०२२-२३ मध्ये ५,२०० किमी नवीन रेल्वेमार्ग तयार केले आणि याच गतीने काम सुरू आहे. ‘हाय-स्पीड’ वाहतूक व्यवस्था हाताळण्यास सक्षम रेल्वे पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी जुने रूळ बदलण्यावर भर दिला आहे.

रूळ बदलण्याचा गाडीच्या वेगाशी संबंध आहे का?

रेल्वेगाड्यांची गती ११० वरून १६० किमी प्रतितास करण्यासाठी रूळ अधिक वजनाचे वापरण्यात येत आहेत. त्यासाठी सध्याचे रूळ आणि त्याखालील स्लीपर बदलण्यात येत आहेत. सध्या जे रूळ आहेत त्यांचे वजन ५२ किलो प्रतिमीटर आहे. त्याऐवजी आता ६० किलो प्रतिमीटर वजनाचे रूळ टाकण्यात येत आहेत. या रुळांची वजन सहन करण्याची क्षमता अधिक आहे. या अधिक वजनाच्या रुळाखालील गिट्टी निघाली किंवा फट (गॅप) निर्माण झाली तरी ते रुळ वाकणार नाहीत. त्यामुळे रेल्वेगाडी त्यावरून अधिक वेगाने धावणार आहे. तसेच रेल्वे रुळांमधील निर्माण होणारी फट नष्ट करण्यासाठी रुळांची लांबी देखील वाढवण्यात येत आहे. ही लांबी ६५ मीटरपर्यंत वाढवण्यात येत आहे.

हेही वाचा…मिरची आणि मानवी उत्क्रांती यांचं काय नातं? तिखटजाळ असूनही आपण ती का खातो?

आणखी कोणते घटक महत्त्वाचे आहेत?

सिग्नल यंत्रणेचेही अद्यावतीकरण करण्यात येत आहे. ‘डबल डिस्टंट सिग्नल’ यंत्रणा बसवण्यात येत आहे. या तंत्रज्ञानामुळे सर्व रेल्वेगाड्या पूर्ण क्षमतेने धावतील आणि अपघात होण्याची शक्यता देखील कमी होईल. या यंत्रणेमुळे रेल्वेगाड्यांना स्थानकाच्या बाहेरदेखील (आऊटरवर) ताटकळत ठेवण्याची आवश्यकता राहणार नाही. याशिवाय स्लीपरची (रुळाखाली आडव्या पाट्या) देखील संख्या वाढवण्यात येत आहे. दर एक किलोमीटर अंतराच्या रेल्वेमार्गावर १६०० सिमेंट काँक्रिटचे स्लीपर टाकण्यात येत आहेत. पूर्वी १ किलोमीटर अंतरासाठी १५४० सिमेंट काँक्रिटचे स्लीपर टाकण्यात येत होते. आता त्यापैकी १२० स्लीपर अधिक वापरण्यात येत आहे. या उच्च क्षमता असलेल्या रुळांमुळे कंपन कमी होते. रुळांचे कंपन कमी होत असल्याने डबे रुळांवरून घसरण्याची शक्यता कमी असते. रुळांचे वजन अधिक असल्याने रूळ एक-दुसऱ्याला जोडणारे सांधेदेखील मजूबत राहणार आहेत.

हेही वाचा…तब्बल ३० वर्षे सत्तेत असलेल्या आफ्रिकन काँग्रेसला निवडणुकीत फटका; तरीही हा पक्ष सत्तेत कसा येत आहे?

कुठल्या भागात रेल्वेमार्गाचे काम सुरू आहे?

देशात सर्वत्र नवीन रेल्वेमार्ग आणि रूळ बदलण्याचे काम सुरू आहे. मध्य भारतात नागपूर ते इटारसी, नागपूर ते राजनांदगाव, नागपूर ते सेवाग्राम, सेवाग्राम ते बल्लारशहा या दरम्यान रेल्वेने तिसरा आणि चौथ्या रेल्वेमार्गाचे काम सुरू केले आहे. तसेच इटारसी-नागपूर दरम्यान धारखोह-घोडाडोंगरी येथे ६० किलोंचे रूळ बसवण्यात आले आहेत. यामुळे रेल्वेमार्गाची क्षमता वाढली आहे. या रेल्वेमार्गावरून १५० किलोमीटर गतीनेदेखील गाड्या धावू शकतील. काही ठिकाणी १३० किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने धावण्यासाठी चाचणीदेखील झाली आहे.