News Flash

कोल्हापुरात मुसळधार पाऊस

 कोकण किनाऱ्यावर ‘तॉक्ते’ चक्रीवादळ घोंगावत आहे. यामुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा धोका असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला होता.

कोल्हापूर : ‘तॉक्ते’ चक्रीवादळामुळे कोल्हापूर जिल्ह्यत शनिवारी वादळासह जोरदार पाऊस पडला. दिवसभरात दोनतीन वेळा पावसाच्या सरी आल्या. तर सायंकाळी विजांचा कडकडाट, जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने जिल्ह्यला झोडपून काढले.

कोकण किनाऱ्यावर ‘तॉक्ते’ चक्रीवादळ घोंगावत आहे. यामुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा धोका असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला होता. आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सायंकाळी सोसाटय़ाचा वारा सुरू झाला. पाठोपाठ मुसळधार पाऊस पडू लागला. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. चक्रीवादळाचा वेग मंदावे पर्यंत बाहेर पडण्याचे टाळावे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2021 1:21 am

Web Title: heavy rains in kolhapur ssh 93
Next Stories
1 सत्तांतरानंतर ‘गोकुळ ’ मधील आठवणींचा पट उलगडला
2 कोल्हापुरात योग्य उपचारांअभावी करोना रुग्णांच्या मृत्यूंमध्ये वाढ
3 कोल्हापूर जिल्ह्यतील उद्योग आठवडाभर बंद
Just Now!
X