News Flash

IND vs AUS : पहिल्या वन-डे सामन्याआधी भारताच्या गोटात चिंता, सरावादरम्यान धोनीला दुखापत

संघ व्यवस्थापनाकडून दुखापतीबद्दल स्पष्टीकरण नाही

IND vs AUS : पहिल्या वन-डे सामन्याआधी भारताच्या गोटात चिंता, सरावादरम्यान धोनीला दुखापत

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन टी-20 सामन्यांच्या मालिकेत पराभव स्विकारावा लागल्यानंतर, भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे सामन्याची मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. शनिवारी हैदराबादच्या मैदानावर हा पहिला सामना खेळवण्यात येईल. मात्र या सामन्याआधीच भारतीय गोटामध्ये चिंतेच वातावरण पसरलं आहे. संघाचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी नेट्समध्ये सराव करत असताना दुखापतग्रस्त झाल्याचं समजत आहे. सरावादरम्यान धोनीच्या हाताला दुखापत झाल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार धोनीने सर्वप्रथम नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करण्यावर भर दिला. यावेळी एक चेंडू अनपेक्षितपणे उसळी घेऊन धोनीच्या हातावर आदळला. या घटनेनंतर धोनी दुखापतीमुळे त्रस्त दिसत होता, यानंतर त्याने सराव थांबवण पसंत केलं. धोनीला झालेली दुखापत गंभीर आहे की नाही यावर संघ व्यवस्थापनाने अजुनही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2019 3:07 pm

Web Title: ind vs aus ms dhoni suffers injury scare at net sessions ahead of 1st odi
टॅग : Bcci,Ind Vs Aus,Ms Dhoni
Next Stories
1 विंग कमांडर अभिनंदन यांच्यासाठी शिखर धवनचा भावनिक संदेश
2 IPL 2019 : जेव्हा मुंबई इंडियन्स स्वतःच्याच कर्णधाराची जाहीर फिरकी घेतं
3 महागणपतीच्या साक्षीने ठरणार यंदाचा ‘महाराष्ट्र श्री’
Just Now!
X