09 July 2020

News Flash

IND vs BAN : इंदूर कसोटीत भारताचा डावाने विजय ! कर्णधार विराटचा धोनीला धोबीपछाड

१ डाव १३० धावांनी भारत विजयी

भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने इंदूर कसोटी सामन्यात डावाने विजय मिळवला आहे. एक डाव आणि १३० धावांनी विजय मिळवत भारताने बांगलादेशविरुद्ध मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. या मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना २२ नोव्हेंबरपासून कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर सुरु होणार आहे. भारतीय संघाचा हा पहिला दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे.

बांगलादेशवर डावाने मिळवलेल्या विजयासोबतच कर्णधार विराट कोहलीने महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने विराटचा हा १० वा डावाने विजय ठरला आहे. धोनीने कर्णधार म्हणून ९ सामन्यांमध्ये डावाने विजय मिळवून दिला आहे.

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत असताना बांगलादेशचा संघ केवळ १५० धावांवर गारद झाला. यानंतर मयांक अग्रवालचं द्विशतक आणि त्याला इतर फलंदाजांनी दिलेली साथ या जोरावर भारताने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली. भारताने आपला पहिला डाव ४९३ धावांवर घोषित केला.

अवश्य वाचा – IND vs BAN : दुसरा डाव शमीचा ! पटकावला दोन वर्षांत सर्वोत्तम गोलंदाज बनण्याचा बहुमान

प्रत्युत्तरादाखल बांगलादेशची दुसऱ्या डावातही खराब सुरुवात झाली. मोहम्मद शमी, रविचंद्रन आश्विन, उमेश यादव आणि इशांत शर्मा यांनी टिच्चून मारा करत बांगलादेशची झुंज मोडून काढली. दुसऱ्या डावात बांगलादेशकडून मुश्फिकुर रहिमने ६४ धावांची खेळी केली, मात्र त्याची झुंज अपयशीच ठरली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2019 3:52 pm

Web Title: ind vs ban 1st test indore team india register win by 1 inning and 130 runs break dhoni record psd 91
Next Stories
1 IND vs BAN : दुसरा डाव शमीचा ! पटकावला दोन वर्षांत सर्वोत्तम गोलंदाज बनण्याचा बहुमान
2 विंडीजविरुद्ध मालिकेत धोनी पुनरागमन करणार? BCCI म्हणतं…
3 ‘Practice makes ‘Hitman’ perfect!’, हा व्हिडीओ एकदा पहाच
Just Now!
X