News Flash

IPL 2019 : मुंबईविरुद्ध सामन्यात DJ Bravo चमकला, चेन्नईकडून बळींचं शतक

ब्राव्होने घेतला सूर्यकुमार यादवचा बळी

मुंबईच्या वानखेडे मैदानावर मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यातील सामन्यात, अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत मुंबईने 170 धावांपर्यंत मजल मारली. हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्ड जोडीने फटकेबाजी करत संकटात सापडलेल्या आपल्या संघाला आश्वासक धावसंख्येपर्यंत आणलं. चेन्नईकडून अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने एक बहुमान आपल्या नावावर केला आहे. ब्राव्हो चेन्नईकडून गोलंदाजीमध्ये 100 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे.

ब्राव्होने मुंबईचा अर्धशतकवीर गोलंदाज सूर्यकुमार यादवला बाद केलं. उंच फटका खेळण्याच्या नादात सूर्यकुमार 59 धावांवर बाद झाला. त्याने 59 धावा केल्या. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरचा अपवाद वगळता सर्व गोलंदाजांनी 1-1 बळी घेतला. मात्र अखेरच्या षटकात हार्दिक आणि कायरन पोलार्डने ब्राव्होची चांगलीच धुलाई केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2019 10:22 pm

Web Title: ipl 2019 mi vs csk dwane bravo first man for csk to complete 100 wickets
टॅग : Csk,IPL 2019,Mi
Next Stories
1 चेन्नईचा विजयरथ मुंबईत अडकला, घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय
2 ऐकावं ते नवलच ! आयपीएलमुळे पाक क्रिकेटला धोका, सरकारने प्रक्षेपणही थांबवलं
3 राहुल द्रविडचं प्रमोशन, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत वर्णी लागण्याची शक्यता
Just Now!
X