News Flash

IPL 2021 : RCBविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबईला धक्का, ‘स्टार’ खेळाडू संघाबाहेर

आजपासून आयपीएलच्या नव्या पर्वाला सुरुवात

मुंबई इंडियन्स

विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आणि रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याद्वारे आयपीएलच्या चौदाव्या मोसमाची सुरुवात होणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबईच्या गोटातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मागील हंगामात रोहित शर्मासह सलामी देणारा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डि कॉक आज खेळू शकणार नाही.

मुंबई इंडियन्सने याबाबत वृत्त दिले. क्विटंन डिकॉकच्या अनुपस्थितीत रोहितसोबत सलामीला कोण येणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. डिकॉक आणि रोहित मागील दोन वर्षांपासून मुंबईला उत्तम सलामी देत आहेत. डि कॉक बीसीसीआयच्या प्रोटोकॉलनुसार, 7 दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करत आहे.

Quinton de Kock क्विंटन डि कॉक

 

डिकॉकच्या अनुपस्थितीत यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन रोहित शर्माबरोबर सलामीला येऊ शकतो. त्यामुळे मुंबईची डावी-उजवी रणनीती कायम राखली जाईल. अलीकडेच टीम इंडियाकडून सलामी देताना ईशानने 56 धावांची शानदार अर्धशतकी खेळी साकारली. अशा परिस्थितीत आता ईशान किशन रोहितबरोबर खेळताना दिसू शकेल.

आयपीएलच्या चौदाव्या सत्रात मुंबई आणि आरसीबी यांच्यातील सामना सायंकाळी साडेसहा वाजता चेन्नईच्या मैदानावर खेळला जाईल. ज्यामध्ये दोन्ही संघ विजयासह पदार्पण करू इच्छित आहेत.

मुंबई इंडियन्स

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, क्रुणाल पंड्या, जेम्स नीशम, नॅथन कुल्टर-नाईल, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, पीयुष चावला, धवल कुलकर्णी , सौरभ तिवारी, आदित्य तरे, अ‍ॅडम मिलने, ख्रिस लिन, जयंत यादव, अनमोलप्रीतसिंग, अनुकुल रॉय, मोहसिन खान, अर्जुन तेंडुलकर, मार्को जानसेन, युधवीर सिंग चरक.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 6:38 pm

Web Title: mumbai indians confirm quinton de kock wont be available for opener against rcb adn 96
टॅग : Mi
Next Stories
1 MI Vs RCB: अंतिम संघात ‘या’ खेळाडुंना स्थान मिळण्याची शक्यता
2 MI vs RCB : आजच्या सामन्यात पोलार्डला दोन ‘द्विशतके’ ठोकण्याची संधी
3 IPL 2021: चेतेश्वर पुजाराला फलंदाजीबाबत ब्रेट लीने दिला सल्ला
Just Now!
X