भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सेमी फायनल रंगली आहे. नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजी घेतली आहे. रोहित आणि गिल यांच्या जोडीने उत्तम सुरुवात केली. रोहित शर्माचं अर्धशतक थोडक्यात हुकलं. रोहितची विकेट गेल्यानंतर विराट कोहली मैदानात आला. विराट बॅटिंग करत असताना साऊथी ने विराटला एक ऑफ लेंथ शॉर्ट बॉल फेकला. जो त्याच्या नी पॅडवर लागला. त्यावेळी विराट LBW होणार का? या विचाराने एक क्षणासाठी उपस्थितांच्या काळाजाचा ठोका चुकला. मात्र अंपायरने विराटला नॉट आऊट दिलं. त्यानंतर केन विल्यमसनने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी मैदानात टेन्शनच होतं. अभिनेत्री अनुष्का शर्माची म्हणजेच विराटच्या पत्नीची रिअॅक्शन कॅमेरात कैद झाली आहे.

अनुष्का विराटला सपोर्ट करण्यासाठी मैदानात आली आहे. विराटच्या बाजूने जेव्हा निर्णय आला तेव्हा अनुष्काचा जीव भांड्यात पडला. मात्र तोपर्यंत तिची प्रतिक्रिया पाहण्यासारखीच होती. जी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तिच्या या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया येत आहेत. तिच्या चेहऱ्यावरची सुरुवातीची काळजी आणि नंतर तिचं रिलॅक्स होणं हे दोन्हीही कॅमेरात कैद झालं आहे.

२०२३चा उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. आजच्या सामन्यासाठी डेव्हिड बेकहॅम पासून ते मनोरंजन क्षेत्रातील स्टार्सपर्यंत सर्वांनी स्टेडियममध्ये हजेरी लावली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याच मैदानावर भारताने दुसरा विश्वचषक (२०११) जिंकला होता. लाखो क्रिकेट चाहत्यांना स्टेडियममधून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे, परंतु ही संधी फक्त काही हजार लोकांनाच मिळेल, ज्यांनी योग्य वेळी तिकीट काढले. आजच्या सामना पाहण्यसाठी बॉलीवूड स्टार्सही स्टेडियममध्ये उपस्थित आहेत. त्यात सलमान खान, आमिर खान, रणबीर कपूर यांच्या नावांचा समावेश आहे. दुसरीकडे, माजी दिग्गज फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम देखील या सामन्याचे साक्षीदार असणार आहे. सचिन तेंडुलकर समवेत तो स्टेडियममध्ये बसला आहे.