scorecardresearch

Ishant Sharma: ‘मी जवळपास महिनाभर ढसाढसा रडलो…’, कारकिर्दीतील वाईट काळ आठवून इशांत शर्मा भावूक

Ishant Sharma Revealed: २०१३ मध्ये इशांत शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात एका षटकात ३० धावा दिल्या होत्या. याबाबत इशांत शर्माने आता एक खुलासा केला आहे.

Ishant Sharma Revealed
इशांत शर्मा (फोटो-संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

Ind vs Aus Series 2013: टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माने आपल्या कारकिर्दीत अनेक प्रसंगी भारतासाठी चमकदार कामगिरी केली आहे. इशांत शर्माने शानदार गोलंदाजी करून कसोटी क्रिकेटचा दर्जा उंचावला आहे. १०० कसोटी सामने खेळलेल्या काही वेगवान गोलंदाजांपैकी इशांत शर्मा एक आहे. मात्र, कसोटीप्रमाणेच मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये इशांतला करिअर करता आले नाही.

दरम्यान, इशांत शर्माने अलीकडेच त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील वाईट टप्प्याची आठवण करून देत काही आश्चर्यकारक खुलासे केले आहेत. त्याने सांगितले की, त्याच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती, जेव्हा तो जवळपास एक महिना ढसाढसा रडायचा.

संघाच्या पराभवाचे कारण मी होतो –

इशांत शर्मा अलीकडेच क्रिकबझच्या राइज ऑफ न्यू इंडिया शोमध्ये त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्प्याची आठवण करून दिली. २०१३ साली भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय सामना खेळला जात होता. त्यावेळी धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची स्थिती वाईट होती. शेवटच्या ३ षटकात संघाला ४४ धावांची गरज होती. त्यावेळी इशांत शर्माने एका षटकात ३० धावा दिल्या होत्या.

हेही वाचा – IND vs AUS 3rd Test: केएल राहुलच्या संघातील स्थानाबद्दल रवी शास्त्रीचं मोठं वक्तव्य; म्हणाले, ‘जर उपकर्णधार…’

या सामन्याबद्दल बोलताना इशांत शर्मा म्हणाला, “२०१३ मध्ये मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेला सामना माझ्यासाठी सर्वात वाईट क्षण होता. माझ्यावर यापेक्षा वाईट वेळ कधी येऊ शकते, असे मला वाटत नाही. माझ्यासाठी ते अवघड होते. आणि मी खूप धावा दिल्या म्हणून नाही, तर मी सर्वात जास्त दुखावलो होतो, ते म्हणजे संघाच्या पराभवाचे कारण मी होतो. त्यावेळी मी माझ्या पत्नीला डेट करत होतो. जवळपास महिनाभर त्तिच्याशी फोनवर बोलत असताना मी रोज रडत होतो.”

माही भाई आणि शिखरने साथ दिली होती –

त्यानंतर बराच काळ इशांत शर्माने त्या पराभवासाठी स्वत:ला जबाबदार मानले. इशांत शर्माने खुलासा केला की, त्यावेळी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि शिखर धवन त्याच्याशी बोलायला आले होते. त्यानी इशांतला प्रोत्साहन दिले होते.

हेही वाचा – PSL 2023: पाकिस्तान सुपर लीग दरम्यान चोरी! चोरट्यांनी स्टेडियममधील सुरक्षा कॅमेरे, केबल्स आणि बॅटऱ्याही केल्या लंपास

क्रिकबझवर इशांत पुढे म्हणाला, “सर्वात चांगली गोष्ट म्हणजे माही भाई आणि शिखर धवन माझ्या खोलीत आले. ते म्हणाले, बघ तू चांगला खेळत आहेस. पण त्या एका सामन्यानंतर बहुधा सगळ्यांना वाटू लागलं की मी मर्यादीत षटकातील गोलंदाज नाही.”

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-02-2023 at 18:58 IST