भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर सामना अनिर्णित राहिला. अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या सामन्यात दोन्ही संघांच्या फलंदाजांनी भरघोस धावा केल्या. उर्वरित तीन सामन्यांमध्ये गोलंदाजांचा वरचष्मा होता. टीम इंडियाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २-१ ने जिंकली. आता भारतीय कर्णधार रोहित शर्मा अष्टपैलू रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाबद्दल भरभरून बोलला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी या चार सामन्यांमध्ये फिरकीपटू वर्चस्व गाजवतील असा अंदाज वर्तवला जात होता. अश्विन आणि जडेजा यांना संयुक्तपणे मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आल्याने मालिकेच्या शेवटी हेच सिद्ध झाले.

अश्विन-जडेजाच्या भविष्यावर रोहितचे मोठे वक्तव्य

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या मालिकेत अश्विन-जडेजा जोडीने पुन्हा एकदा आश्चर्यकारक कामगिरी केली आणि त्यांनी मिळून ४७ विकेट घेतल्या. जेव्हा कर्णधार रोहित शर्माला या दोघांच्या भविष्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो हसला आणि म्हणाला, “खरं सांगू, मला त्यांच्याबद्दल माहिती नाही पण मी आता नक्कीच राहीन, पण चार वर्षे खूप मोठा कालावधी आहे. म्हणजे भारतीय क्रिकेटसाठी, मला आशा आहे की तो राहील आणि तो भारतासाठी भरपूर क्रिकेट खेळेल.”

रोहित शर्मा पुढे म्हणाला की, “मी कर्णधार म्हणून केलेल्या प्रत्येक सामन्यातून मी अजूनही शिकत आहे. मी इतर फॉरमॅटच्या तुलनेत टी२० क्रिकेटमध्ये अधिक कर्णधारपद भूषवले आहे, पण कसोटी क्रिकेटमध्ये माझ्याकडे फक्त सहा सामन्यांचे कर्णधारपद आहे. मी अजून शिकत आहे माझे सोबती खूप क्रिकेट खेळले आहेत आणि ते मला मदत करण्यासाठी आहेत.” रोहित म्हणाला, “तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास सक्षम असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी तुम्हाला मैदानावर शांत राहावे लागेल. मी संघाचे कर्णधार असताना या गोष्टींचा विचार करतो. मग मी म्हटल्याप्रमाणे मी अजूनही कर्णधारपद शिकत आहे. मी त्याचा आनंद घेत आहे.”

अश्विनने टाकले अँडरसनला मागे

अहमदाबाद येथील चौथ्या कसोटी पूर्वी अश्विन व अँडरसन संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर होते. मात्र, अश्विनने अहमदाबाद कसोटी चमकदार कामगिरी केली. त्याने या सामन्यात सात बळी मिळवत अँडरसनला मागे टाकले. आता अश्विनच्या नावे ८६९ रेटिंग गुण झाले असून, अँडरसन ६५९ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानी राहिला. त्याला आता अश्विनला मागे टाकण्यासाठी थेट ऍशेस मालिकेची वाट पहावी लागेल. यादरम्यान अश्विनला जागतिक कसोटी चॅम्पियनशिप चा अंतिम सामना खेळण्याची संधी देखील मिळू शकते.

हेही वाचा: Delhi Capital: “मिळू शकते मोठी संधी…”, अष्टपैलू अक्षर पटेल संदर्भात दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षकाचे मोठे विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्रमवारीचा विचार केल्यास या दोघांव्यतिरिक्त तिसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स हा आहे. त्याच्या नावे ८४१ रेटिंग गुण आहेत. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर ८२५ गुणांसह दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा व पाचव्या क्रमांकावर पाकिस्तानचा शाहीन शाह आफ्रिदी ७८७ गुणांसह काबीज आहे. भारतीय संघाचे जसप्रीत बुमराह रवींद्र जडेजा हे प्रत्येकी एका स्थानाच्या नुकसानासह अनुक्रमे सातव्या व नवव्या स्थानी घसरले आहेत. अश्विन याच्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची चार सामन्यांची मालिका संस्मरणीय ठरली. त्याने मालिकेतील प्रत्येक सामन्यात आपले योगदान दिले. त्याने या मालिकेत सर्वाधिक २५ विकेट्स घेतल्या. यासह त्याने रवींद्र जडेजासोबत मालिकावीर पुरस्कार देखील आपल्या नावे केला.