पाकिस्तान पुढील वर्षी आशिया कपचे यजमानपद भूषवणार आहे. त्यानंतर भारत एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा आयोजित करेल. पुढील वर्षी होणार्‍या दोन्ही स्पर्धांबाबत वक्तव्यांच्या फेर्‍या बऱ्याच दिवसांपासून सुरू होत्या. जर भारतीय संघ आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानात आला नाही तर आमचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा दौरा करणार नाही, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष रमीझ राजा यांनी म्हटले आहे. भारताचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अनुराग ठाकूर यांना रमीज राजा यांच्या वक्तव्याबाबत विचारण्यात आले असता, त्यांनी योग्य वेळेची वाट पाहा असे सांगितले. तो म्हणाला, “योग्य वेळेची वाट पहा. भारत आज क्रीडा विश्वातील एक मोठी शक्ती आहे आणि कोणताही देश त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही.भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही याचा निर्णय गृहमंत्रालय घेईल, असे क्रीडामंत्र्यांनी २० ऑक्टोबर रोजी सांगितले होते. या प्रकरणावर भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर म्हणाला, “हा बीसीसीआय आणि पीसीबीचा निर्णय आहे. ते जो काही निर्णय घेतील, तो ते आपापसात घेतील.

team india kl rahul bcci
IND Vs ENG : केएल राहुल पाचव्या कसोटीलाही मुकणार, संघात दिग्गज खेळाडूचं पुनरागमन; अशी असेल टीम इंडिया
First Secretary Anupama Singh
“जम्मू-काश्मीरच्या प्रकरणात…”, भारताच्या प्रतिनिधी अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले खडे बोल
Nitisha Kaul sent back to uk
युकेतून भारतात आलेल्या काश्मिरी पंडित प्राध्यापिकेला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी परत पाठवलं मायदेशी; नेमकं प्रकरण काय?
pm modi targets india alliance during his tamil nadu and kerala visit
‘इंडिया’ला पराभवाची खात्री! पंतप्रधान मोदींची केरळ, तमिळनाडू दौऱ्यात विरोधकांवर टीका

काय म्हणाले रमीज राजा?

एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलताना रमीज राजा म्हणाले- पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या विश्वचषकात पाकिस्तान सहभागी झाला नाही, तर कोण पाहणार? आमची भूमिका स्पष्ट आहे. जर भारतीय संघ इथे आला तर आम्ही विश्वचषकासाठी जाऊ. जर ते आले नाहीत तर ते आमच्याशिवाय विश्वचषक खेळू शकतात. आम्ही आक्रमक भूमिका घेऊ.

हेही वाचा :   IND vs NZ 2nd ODI: न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय, भारताला आज विजय आवश्यक

रमीज राजा म्हणाले- आमची टीम चांगली कामगिरी करत आहे. मी नेहमी म्हणत आलो की आपल्याला पाकिस्तान क्रिकेटची अर्थव्यवस्था सुधारण्याची गरज आहे आणि आपण चांगली कामगिरी केली तरच ते होऊ शकते. २०२१ च्या टी२० विश्वचषकात आम्ही भारताचा पराभव केला. टी२० आशिया कपमध्ये आम्ही भारताला हरवले. एका वर्षात पाकिस्तान क्रिकेट संघाने एक अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था असलेल्या संघाला दोनदा पराभूत केले.

काय आहे हा संपूर्ण वाद?

बीसीसीआयचे सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष जय शाह म्हणाले होते की टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही. ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. यानंतर वाद सुरू झाला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आशियाई क्रिकेट परिषदेची तातडीची बैठक घेण्याची मागणी केली होती. पीसीबीने या प्रकरणावर निर्णय घेण्यासाठी एसीसीला आशियाई क्रिकेट परिषदेची तातडीची बैठक बोलावण्याचे आवाहन केले होते. यापूर्वी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटले होते की जर भारताने पाकिस्तानमध्ये होणारा आशिया चषक तटस्थ ठिकाणी आयोजित केला तर पीसीबी २०२३ मध्ये भारतात होणारा एकदिवसीय विश्वचषक तटस्थ ठिकाणी आयोजित करण्याची मागणी करेल.

हेही वाचा :   FIFA World Cup 2022: मेस्सी आणि फर्नांडिसच्या जादुई गोलमुळे अर्जेंटिनाच्या बाद फेरीतील आशा कायम

टीम इंडिया २००८ मध्ये शेवटच्या वेळी पाकिस्तानला गेली होती

भारतीय क्रिकेट संघाने २००८ मध्ये शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता. २००८ आशिया चषकाचे आयोजन पाकिस्तानने केले होते. यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आणि भारत कधीच पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला नाही. पाकिस्तानने शेवटचा भारत दौरा २०१३ मध्ये केला होता. यानंतर दोन्ही देशांमधील राजकीय संबंध आणखी बिघडले आणि ही दोन्ही देशांमधील शेवटची मालिका ठरली.