दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुणे येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात भारताने धडाकेबाज कामगिरी केली आहे. पहिल्या डावात पहिल्या डावात ६०१ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर, भारताने आफ्रिकेला २७५ धावांवर बाद करत त्रिशतकी आघाडी घेतली. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस आफ्रिकेचा डाव संपुष्टात आल्यानंतर पंचांनी दिवसाचा खेळ थांबवला. रविचंद्रन आश्विनने पहिल्या डावात ४ बळी घेतले.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वात कमी कसोटी सामन्यांमध्ये ५० बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आश्विनने स्वतःचं स्थान मिळवलं आहे. आश्विनने ९ कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी करुन दाखवली आहे.

पहिल्या डावातील त्रिशतकी आघाडी घेतल्यानंतर भारताने आफ्रिकेला दुसऱ्या डावात फॉलोऑन दिला. मात्र दुसऱ्या डावातही आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नाही. इशांत शर्मा आणि उमेश यादव यांनी पहिल्याच सत्रात आफ्रिकेला दोन धक्के दिले. दरम्यान गेल्या १० वर्षांत आफ्रिकेवर कसोटी क्रिकेटमध्ये फॉलोऑन लादण्याची ही पहिलीच वेळ आहे.

अवश्य वाचा – Ind vs SA : दक्षिण आफ्रिकेवर लाजिरवाणा प्रसंग, १० वर्षांत पहिल्यांदाच घडली अशी घटना