scorecardresearch

Premium

IND vs WI: हार्दिक पांड्याच्या चॅलेंजवर निकोलस पूरनने केली बोलती बंद, नेमकं काय झालं? पाहा Video

India vs West Indies: भारताविरुद्धच्या टी२० मालिकेत निकोलस पूरनने चमकदार कामगिरी करत संघाला मालिका जिंकून देण्यात मोलाचे योगदान दिले. या मालिकेत पूरनच्या बॅटने एकूण १७६ धावा केल्या होत्या.

Hardik Pandya gave the challenge to Pooran then the West Indies batsman blew the senses of the Indian captain watch Video
टी२० मालिका संपल्यानंतर निकोलस पूरनने हार्दिक पांड्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. सौजन्य- (इन्स्टाग्राम)

Nicholas Pooran on Hardik Pandya: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी२० मालिका संपल्यानंतर निकोलस पूरनने हार्दिक पांड्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. पूरनने अकिल हुसैनसोबत एक व्हिडीओ बनवला आहे, ज्यामध्ये तो तोंड बंद ठेवण्याचे हावभाव करत आहे आणि त्याच्यासोबत अकील हुसेन आहे, जो फ्लाइंग किस देत आहे. हा व्हिडीओ शेअर करत असताना पूरनने लिहिले आहे की, “कोणाला माहीत आहे, हे सांगण्याची गरज नाही. ज्याला सांगतो त्याला माहिती आहे.”

पूरनच्या पोस्टवरून तो काय बोलण्याचा प्रयत्न करत आहे याचा अंदाज लावणे कठीण आहे, परंतु त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अनेक स्टोरी देखील पोस्ट केल्या आहेत. हे पाहून पूरनने हार्दिक पांड्याला चोख प्रत्युत्तर दिले असून तोंड बंद ठेवण्यास सांगितले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

shubman gill dengue positive news
World Cup 2023: पहिल्या सामन्याआधीच भारताला मोठा धक्का; शुबमन गिल मुकण्याची शक्यता!
England vs New Zealand Oneday Cricket World Cup 2023
World Cup 2023: गोळीच्या वेगाने आलेल्या चेंडूवर, जो रूटने रिव्हर्स स्वीप मारत ठोकला शानदार षटकार, पाहा VIDEO
The name is enough Yuzvendra Chahal said a big thing by tweeting about Ravichandran Ashwin's bowling
Yuzvendra Chahal: आर. अश्विनची दमदार कामगिरी अन् चहलची पोस्ट आली चर्चेत; म्हणाला, “फक्त हे नावच…”
Suryakumar Yadav has a game that creates fear among his opponents Virender Sehwag big statement
Virender Sehwag: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ‘मिस्टर ३६०’ने केलेल्या अर्धशतकावर सेहवागचे सूचक विधान; म्हणाला, “सूर्यकुमारची फलंदाजी…”

काय प्रकरण आहे?

भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने गमावले होते, मात्र तिसऱ्या सामन्यात भारताने पुनरागमन करत सात विकेट्सने सामना जिंकला होता. यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला की, “निकोलस पूरनने माझ्याविरुद्ध मोठे शॉट्स खेळले तर मला ते अधिक आवडेल.” हार्दिक म्हणाला, “निकीला जर (निकोलस पूरन) मला माझ्याविरुद्ध मोठे शॉट्स मारायचे असेल तर त्याला मारू द्या कारण, हीच योजना होती. मोठा फटका मारण्याच्या नादात त्याला आम्ही बाद करू शकू. मी अशा स्पर्धेचा आनंद घेतो मला माहित आहे की तो हे ऐकत असेल आणि पाचव्या टी२० सामन्यात माझ्या षटकात तो मोठे फटके मारेल.”

हेही वाचा: Prithvi Shaw: आधी द्विशतक अन् आता पुन्हा एक शतक; वर्ल्डकपच्या संघात ‘पृथ्वी शॉ’ने ठोकली दावेदारी

चौथ्या सामन्यात कुलदीप यादवने पूरनला लवकर बाद केले आणि भारतीय संघाने १७९ धावांचे आव्हान अगदी सहजरीत्या पार केले. भारताकडून शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी अर्धशतके झळकावून संघाला विजय मिळवून दिला. पाचव्या सामन्यात पूरनने हार्दिकचा अंदाज खरा ठरविला. १६६ धावांचा पाठलाग करताना त्याने हार्दिकच्या षटकात सलग दोन गगनचुंबी षटकार ठोकले आणि त्याची बोलतीच बंद केली.

हेही वाचा: IND vs WI: वेस्ट इंडीजमध्ये भारतीय संघाची झाली नाचक्की, जे १७ वर्षात घडलं नाही ते हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीखाली…

निकोलस पूरनने शानदार ४७ धावा करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. तो या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आणि मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. पूरनच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे वेस्ट इंडिजने मालिका ३-२ अशी जिंकली. भारताने २५ महिन्यांत पहिली टी२० आंतरराष्ट्रीय मालिका गमावली. वेस्ट इंडिजने भारताकडून सलग ११ मालिका गमावल्यानंतर एक टी२० आंतरराष्ट्रीय मालिका जिंकली. टी२० मालिकेतील हा विजय एकदिवसीय विश्वचषकात अपयशी ठरलेल्या वेस्ट इंडिजसाठी उत्साहवर्धक आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs wi nicholas pooran replied to hardik pandya posted a video and asked in gestures to keep his mouth shut avw

First published on: 14-08-2023 at 13:17 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×