India vs Sri Lanka 3rd ODI Match: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना रविवारी (१५ जानेवारी) खेळला जात आहे. या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला. त्यामुळे यजमान संघ तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-० असा अजिंक्य आघाडीवर आहे. तिसरा सामना तिरुअनंतपुरम येथे खेळला जात असून या सामन्यासाठीची नाणेफेक झाली. भारताने नाणेफेक जिंकली आहे. दोन्ही संघाच्या अंतिम अकरामध्ये दोन बदल झाले आहेत.

आजच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने आजच्या सामन्यात आपल्या संघात दोन बदल केले आहेत. नियमित कर्णधार रोहित शर्माने टी२० चा कर्णधार हार्दिक पांड्याला विश्रांती देत त्याच्या जागी टी२० चा उपकर्णधार सूर्यकुमार यादवला संघात स्थान दिले. तर वॉशिंग्टन सुंदरला उमरान मलिकच्या जागी संघात घेण्यात आले आहेत.

भारताने दोन्ही एकदिवसीय सामन्यात सहज विजय मिळवला. पहिल्या एकदिवसीयमध्ये विराट कोहलीचे शतक महत्त्वाचे ठरले, तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कुलदीप यादव, मोहम्मद सिराज यांचा अचूक मारा आणि लोकेश राहुलच्या संयमी खेळीने भारताला विजय मिळवून दिले. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देऊन आज इशान किशन व सूर्यकुमार यादव याला संधी मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मोहम्मद शमीलाही विश्रांती मिळेल अशी शक्यता होती. हार्दिक पांड्या व उमरान मलिक यांना आजच्या सामन्यात विश्रांती दिली गेली असून त्यांच्या जागी वॉशिंग्टन सुंदर व सूर्यकुमार यादव यांना अंतिम अकरामध्ये खेळवले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत २-० असा पुढे आहे. पहिल्या सामन्यात शुबमन गिल याने सलामीला येत ६० चेंडूत ७० धावा केल्या होत्या. यामुळे दुसऱ्या सामन्यातही तोच रोहित शर्मा याच्याबरोबर सलामीला आला. सूर्यकुमार मधल्या फळीत फलंदाजी करतो. तेथे पाहिले तर विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली आहे. आजचा सामना जिंकून भारतीय संघ पोंगल आणि मकरसंक्रांतीची गोड गिफ्ट देईल अशी चाहत्यांनी इच्छा व्यक्त केली आहे.