IPL Auction 2024 Highlights (December 19): आयपीएल २०२४ साठी खेळाडूंचा लिलाव दुबईत होत आहे. या लिलावात सर्व १० संघांची एकूण पर्स रक्कम २६२.९५ कोटी रुपये होती. या पर्समधून ७२ खेळाडू खरेदी करण्यात आले. आतापर्यंतच्या आयपीएल इतिहास मिचेल स्टार्क हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने २४.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. त्याचवेळी पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने २०.५० कोटी रुपयांना विकत घेतले.

a cloth seller told foreigner how to sell clothes funny video goes viral
“एकसो पचास मे दो….” कापड विक्रेत्याने फॉरेनरला शिकवले की कपडे कसे विकायचे…
MS Dhoni First Player to Play 250 Matches for CSK
MI vs CSK IPL 2024 : एमएस धोनीने रचला इतिहास! चेन्नई सुपर किंग्जसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
Real Madrid and Manchester City draw match
चॅम्पियन्स लीग फुटबॉल : रेयाल-मँचेस्टर सिटीतील रंगतदार लढत बरोबरीत
Mohammad Nabi's Son Video Viral
IPL 2024 : मोहम्मद नबीच्या गोलंदाजीवर मुलाने मारला ‘हेलिकॉप्टर शॉट’, VIDEO होतोय व्हायरल
Live Updates

IPL Auction 2024 Highlights in Marathi: आयपीएल २०२४ साठी खेळाडूंचा लिलाव दुबईत होत आहे. या लिलावात सर्व १० संघांची एकूण पर्स रक्कम २६२.९५ कोटी रुपये होती. या पर्समधून ७२ खेळाडू खरेदी करण्यात आले.

21:32 (IST) 19 Dec 2023
IPL 2024 Auction : आयपीएल 2024 चा लिलाव संपला, एकूण 72 खेळाडू विकले गेले

आयपीएल 2024 चा लिलाव संपला आहे. या लिलावात एकूण 72 खेळाडूंची विक्री झाली. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क सर्वात महागडा ठरला. स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटींना विकत घेतले. पॅट कमिन्स हा दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपयांना विकत घेतले. लिलावात हर्षल पटेल हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. पंजाब किंग्जने त्याला 11.75 कोटी रुपयांना खरेदी केले. यूपीकडून खेळणारा समीर रिझवी हा सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला. समीरला चेन्नई सुपर किंग्जने 8.40 कोटी रुपयांना विकत घेतले.

21:31 (IST) 19 Dec 2023
IPL 2024 Auction : नांद्रे बर्जरला राजस्थान रॉयल्सने 50 लाख रुपयांना विकत घेतले

लिलावाच्या शेवटच्या फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या नांद्रे बर्जरला राजस्थान रॉयल्सने 50 लाख रुपयांना विकत घेतले. तर भारताचा अनकॅप्ड खेळाडू साकिब हुसेनला केकेआरने २० लाख रुपयांना विकत घेतले. याशिवाय अरवले अवनीशला चेन्नईने 20 लाखांना विकत घेतले. तर पंजाबने स्वप्नील सिंगला २० लाख रुपयांमध्ये आणि शिवालिक शर्माला मुंबईने २० लाख रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले.

21:13 (IST) 19 Dec 2023
IPL 2024 Auction : मोहम्मद नबीला मुंबई इंडियन्सने 1.50 कोटींना विकत घेतले.

मोहम्मद अर्शद खानला लखनऊ सुपर जायंट्सने त्याच्या मूळ किंमत 20 लाख रुपये देऊन खरेदी केले.

मोहम्मद नबीला मुंबई इंडियन्सने त्याच्या मूळ किंमत 1.50 कोटींना विकत घेतले.

शाई होपला दिल्ली कॅपिटल्सने त्याच्या मूळ किंमत 75 लाख रुपयांना विकत घेतले.

गुस ऍटकिन्सनला कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्या मूळ किमतीत 1 कोटी रुपयांना विकत घेतले.

स्वस्तिक चिकाराला दिल्ली कॅपिटल्सने त्याच्या मूळ किंमत 20 लाख रुपयांना विकत घेतले.

आबिद मुश्ताकला राजस्थान रॉयल्सने त्याच्या मूळ किंमत 20 लाखांमध्ये खरेदी केले.

21:12 (IST) 19 Dec 2023
IPL 2024 Auction : मनीष पांडेला केकेआरने 2 कोटींना विकत घेतले

करुण नायरला पुन्हा कोणीही विकत घेतले नाही.

मनीष पांडेला कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्या मूळ किंमत 2 कोटींना विकत घेतले.

रिले रुसोला पंजाब किंग्जने 8 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती.

लोकी फर्ग्युसनला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये देऊन विकत घेतले.

मुजीब उर रहमानला कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्या मूळ किंमत 2 कोटींना विकत घेतले.

21:12 (IST) 19 Dec 2023
IPL 2024 Auction : मनीष पांडेला केकेआरने 2 कोटींना विकत घेतले

करुण नायरला पुन्हा कोणीही विकत घेतले नाही.

मनीष पांडेला कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्या मूळ किंमत 2 कोटींना विकत घेतले.

रिले रुसोला पंजाब किंग्जने 8 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती.

लोकी फर्ग्युसनला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये देऊन विकत घेतले.

मुजीब उर रहमानला कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्या मूळ किंमत 2 कोटींना विकत घेतले.

20:37 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : जे सुब्रमण्यमला सनरायझर्स हैदराबादने त्याच्या मूळ किंमत 20 लाखांमध्ये खरेदी केले.

जे सुब्रमण्यमला सनरायझर्स हैदराबादने त्याच्या मूळ किंमत 20 लाखांमध्ये खरेदी केले. तो आयपीएल लिलावात बोलीसाठी सहभागी झालेला शेवटचा खेळाडू ठरला.

https://twitter.com/IPL/status/1737120850820690125

20:12 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : सुमित कुमारला दिल्ली कॅपिटल्सने 1 कोटी रुपयांना विकत घेतले

नमन धीरला मुंबई इंडियन्सने त्याच्या मूळ किंमत 20 लाखांमध्ये खरेदी केले.

अंशुल कंबोजला मुंबई इंडियन्सने त्याच्या मूळ किंमत 20 लाखांमध्ये खरेदी केले.

सुमित कुमारला दिल्ली कॅपिटल्सने 1 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत 20 लाख रुपये होती.

आशुतोष शर्माला पंजाब किंग्जने त्याच्या मूळ किंमत 20 लाखांमध्ये खरेदी केले.

विश्वनाथ प्रताप सिंगला पंजाब किंग्जने त्याच्या मूळ किंमत 20 लाख रुपयांना विकत घेतले.

शशांक सिंगला पंजाब किंग्जने त्याच्या मूळ किंमत 20 लाख रुपये देऊन खरेदी केले.

तनय थियागराजनला पंजाब किंग्जने त्याच्या मूळ किंमत 20 लाख रुपये देऊन खरेदी केले.

19:51 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : नुवान तुषाराला मुंबई इंडियन्सने 4.80 कोटी रुपयांना विकत घेतले

बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान, ज्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती, त्याला चेन्नई सुपर किंग्जने विकत घेतले. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान तुषारा, ज्याची मूळ किंमत 50 लाख रुपये आहे, त्याला मुंबई इंडियन्सने 4.80 कोटी रुपयांना खरेदी केले. त्याची शैली लसिथ मलिंगासारखी आहे.

19:47 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : झाय रिचर्डसनला मिळाले ५ कोटी

लिलावात ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे वर्चस्व कायम आहे. जिथे गुजरात टायटन्सने स्पेन्सर जॉन्सनला 10 कोटींना खरेदी केले. झाय रिचर्डसनला दिल्ली कॅपिटल्सने 5 कोटी रुपयांना विकत घेतले.

19:44 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : टायमल मिल्ससह हे खेळाडू राहिले अनसोल्ड

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज टायमल मिल्स, ज्याची मूळ किंमत 1.50 कोटी रुपये आहे, त्याला कोणीही विकत घेतले नाही. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज अॅडम मिल्ने, ज्याची मूळ किंमत एक कोटी रुपये आहे, त्याला कोणीही विकत घेतले नाही. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज लान्स मॉरिस, ज्याची मूळ किंमत 75 लाख रुपये आहे, त्याला कोणीही विकत घेतले नाही.

19:41 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : स्पेन्सर जॉन्सनला गुजरात टायटन्सने 10 कोटींना विकत घेतले

ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सन, ज्याची मूळ किंमत 50 लाख रुपये आहे, त्याला खरेदी करण्यासाठी फ्रँचायझींमध्ये स्पर्धा पाहायला मिळाली. अखेर गुजरात टायटन्सने त्याला 10 कोटींना विकत घेतले.

19:30 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : या खेळाडूंना मिळाला नाही खरेदीदार

वेस्ट इंडिजचा यष्टिरक्षक फलंदाज शाई होप, ज्याची मूळ किंमत ७५ लाख रुपये आहे, त्याला कोणीही विकत घेतले नाही. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमेरा, ज्याची मूळ किंमत ५० लाख रुपये आहे, त्याला कोणीही विकत घेतले नाही. ऑस्ट्रेलियाचा बेन द्वारशुईस, ज्याची मूळ किंमत ५० लाख आहे, त्याला कोणीही विकत घेतले नाही. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री, ज्याची मूळ किंमत ७५ लाख रुपये आहे, त्याला कोणीही विकत घेतले नाही. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसन, ज्याची मूळ किंमत 1 कोटी रुपये आहे, त्याला कोणीही विकत घेतले नाही.

19:29 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 :डेव्हिड विलीला लखनऊने दोन कोटींना खरेदी केले

न्यूझीलंडचा अष्टपैलू जेम्स नीशम, ज्याची मूळ किंमत 1.50 कोटी रुपये आहे, त्याला कोणीही विकत घेतले नाही. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कीमो पॉल, ज्याची मूळ किंमत ७५ लाख रुपये आहे, त्याला कोणीही विकत घेतले नाही. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ओडियन स्मिथ, ज्याची मूळ किंमत ५० लाख रुपये आहे, त्याला कोणीही विकत घेतले नाही. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू डेव्हिड विली, ज्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे, त्याला लखनौ सुपर जायंट्सने 2 कोटी रुपयांना विकत घेतले.

19:26 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : आरसीबीने इंग्लंडच्या टॉम करनला विकत घेतले

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंग्लंडचा गोलंदाज अष्टपैलू टॉम कुरनला 1 कोटी 50 लाख रुपयांना विकत घेतले. टॉम हा सॅम कुरनचा भाऊ असून यापूर्वी तो आयपीएलमध्ये खेळला आहे.

https://twitter.com/IPL/status/1737108583656165724

19:24 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : लखनऊने ऑस्ट्रेलियाच्या अॅश्टन टर्नरला विकत घेतले

ऑस्ट्रेलियन मधल्या फळीतील फलंदाज अॅश्टन टर्नरला लखनऊ सुपर जायंट्सने एक कोटी रुपयांना विकत घेतले. ऑस्ट्रेलियाचा हा तुफानी फलंदाज मधल्या षटकांमध्ये तुफानी फलंदाजी करण्यात पटाईत आहे.

https://twitter.com/IPL/status/1737107824592007528

19:22 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : शार्फेन रदरफोर्डला एक्सलेटर राऊंडमध्ये लागली बोली

वेस्ट इंडिजचा स्फोटक अष्टपैलू शर्फन रदरफोर्डला कोलकाता नाईट रायडर्सने एक्सलेटर राऊंडमध्ये त्याच्या मूळ किंमत 1 कोटी 50 लाख रुपयांना विकत घेतले.

https://twitter.com/IPL/status/1737107627434561986

19:17 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : आता सुरू होणार एक्सलेटर राऊंड, आत्तापर्यंत काय-काय झाले? जाणून घ्या

आयपीएल 2024 चा लिलाव आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. केकेआरने त्याला 24.75 कोटींना खरेदी केले. हर्षल पटेल हा सर्वात महागडा भारतीय ठरला. त्याला पंजाब किंग्सने 11.75 कोटी रुपयांना विकत घेतले. याशिवाय सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू समीर रिझवी होता. समीरला चेन्नई सुपर किंग्जने 8.40 कोटी रुपयांना विकत घेतले.

18:51 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : अनकॅप्ड खेळाडूंचे नशीब बदलले

आयपीएल 2024 च्या लिलावात अनेक अनकॅप्ड खेळाडूंचे नशीब बदलले.

20 लाखांची मूळ किंमत असलेले अनेक खेळाडू 5 कोटींहून अधिक रुपयांना विकले गेले.

शुभम दुबे 5.80 कोटी रुपये राजस्थान रॉयल्स</p>

समीर रिझवी 8.40 कोटी चेन्नई सुपर किंग्ज</p>

शाहरुख खान 7.40 कोटी रुपये गुजरात टायटन्स</p>

कुमार कुशाग्र 7.20 कोटी दिल्ली कॅपिटल्स</p>

यश दयाल रु. 5 कोटी आरसीबी

18:31 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : रसिक सलाम आणि मानव सुथार यांना आधारभूत किमतीत खरेदी केले

वेगवान गोलंदाज रसीख दार सलामला दिल्ली कॅपिटल्सने त्याच्या मूळ किंमत 20 लाख रुपये देऊन विकत घेतले. गुजरात टायटन्सने मानव सुथारला २० लाख रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले.

https://twitter.com/IPL/status/1737094695459672098

18:26 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : गुजरात टायटन्सने कार्तिक त्यागीला 60 लाखात खरेदी केले

कार्तिक त्यागीला केवळ 60 लाख रुपये मिळाले

राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादकडून खेळलेला अंडर-19 स्टार आणि वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीला गुजरात टायटन्सने अवघ्या 60 लाख रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले.

18:22 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : गुजरात टायटन्सने सुशांत मिश्राला बनवले करोडपती

युवा अनकॅप्ड खेळाडू सुशांत मिश्राला गुजरात टायटन्सने करोडपती बनवले. सुशांत मिश्रा, ज्याची मूळ किंमत 20 लाख रुपये होती, त्याला गुजरात टायटन्सने 2 कोटी 20 लाख रुपयांना आपल्या संघात समाविष्ट केले.

https://twitter.com/IPL/status/1737092126331007086

18:20 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : यश दयाळ याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 5 कोटींना विकत घेतले

गेल्या मोसमात गुजरात टायटन्सकडून खेळलेला डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाळ याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 5 कोटींना विकत घेतले. केकेआरच्या रिंकू सिंगने अखेरच्या षटकात पाच षटकार मारल्याने यश दयाल प्रसिद्धीच्या झोतात आला होता.

https://twitter.com/IPL/status/1737091363236168089

18:13 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : आणखी एक अनकॅप्ड भारतीय खेळाडू करोडपती झाला

शुभम दुबे आणि समीर रिझवी यांच्यानंतर आणखी एक अनकॅप्ड भारतीय खेळाडू करोडपती झाला आहे. झारखंडकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या 19 वर्षीय कुमार कुशाग्राला दिल्ली कॅपिटल्सने 7.20 कोटी रुपयांना विकत घेतले.

https://twitter.com/IPL/status/1737090433606361537

18:11 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : रिकी भुईला दिल्ली कॅपिटल्सने 20 लाख रुपयांना खरेदी केले

रिकी भुई, ज्याची मूळ किंमत 20 लाख रुपये आहे, त्याला दिल्ली कॅपिटल्सने 20 लाख रुपयांना खरेदी केले. उर्विल पटेल, ज्याची मूळ किंमत 20 लाख रुपये आहे, त्याला कोणीही विकत घेतले नाही.

https://twitter.com/IPL/status/1737089164103877043

18:06 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : टॉम कोहलर कॅडमोरला राजस्थान रॉयल्सने 40 लाख रुपयांना विकत घेतले

टॉम कोहलर कॅडमोर, ज्याची मूळ किंमत 40 लाख रुपये आहे. त्याला राजस्थान रॉयल्सने 40 लाख रुपयांना विकत घेतले.

https://twitter.com/IPL/status/1737088859144429870

17:56 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : आठवा सेट अनकॅप्ड यष्टीरक्षक खेळाडूंचा आहे

या सेटमध्ये अनकॅप्ड यष्टीरक्षकांचा समावेश आहे जे आतापर्यंत देशासाठी खेळलेले नाहीत.

17:54 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : रमणदीपला कोलकाता नाईट रायडर्सने खरेदी केले

20 लाखांची मूळ किंमत असलेल्या रमणदीपला कोलकाता नाईट रायडर्सने या किमतीत खरेदी केले.

https://twitter.com/IPL/status/1737083910683594883

17:46 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : शाहरुख खानसाठी गुजरात टायटन्सने मोजले 7.4 कोटी

40 लाखांची मूळ किंमत असलेल्या शाहरुखला गुजरात टायटन्सने 7.4 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले.

https://twitter.com/oneindiatelugu/status/1737084099045839305

17:42 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : आंगकृष्ण रघुवंशी आणि अर्शिन कुलकर्णी आधारभूत किमतीत विकले

अनकॅप्ड खेळाडू अंक्रिश रघुवंशी आणि अर्शिन कुलकर्णी यांना त्यांच्या मूळ किंमत 20 लाख रुपयांना विकले गेले. आंगकृष्ण रघुवंशीला कोलकाता नाईट रायडर्सने २० लाख रुपयांना विकत घेतले. तर अर्शिन कुलकर्णीला लखनऊ सुपर जायंट्सने २० लाख रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले.

https://twitter.com/ct_hindi/status/1737083465063973308

17:37 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : चेन्नई सुपर किंग्जने समीर रिझवीला 8.40 कोटींना खरेदी केले

चेन्नई सुपर किंग्जने समीर रिझवीला 8.40 कोटींना खरेदी केले. 20 वर्षांचा समीर रिझवी आयपीएल 2024 च्या लिलावात श्रीमंत झाला. चेन्नई सुपर किंग्जने समीर रिझवीला 8.40 कोटी रुपयांना खरेदी केले. समीर अतिशय स्फोटक फलंदाजी करतो.

https://twitter.com/GautamGambhir09/status/1737082146886656158

17:34 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : मोहम्मद, सरफराज आणि राज राहिले अनसोल्ड

मोहम्मद अर्शद खान: 20 लाखांची मूळ किंमत असलेल्या या खेळाडूला कोणीही खरेदीदार मिळाला नाही.

सरफराज खान: या खेळाडूवर कोणत्याही संघाने 20 लाखांची मूळ किंमत असताना बोली लावली नाही.

राज अंगद बावा: कोणत्याही संघाने 20 लाखांची मूळ किंमत असलेल्या अष्टपैलू खेळाडूला खरेदी केले नाही.

17:21 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : राजस्थान रॉयल्सने शुभम दुबेला 5.80 कोटी खरेदी केले

राजस्थान रॉयल्सने अनकॅप्ड खेळाडू शुभम दुबेवर मोठी बोली लावत त्याला 5.80 कोटी रुपयांना खरेदी केले.

https://twitter.com/IPL/status/1737077351152775672

17:17 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 :ब्रेकनंतर पुन्हा लिलाव सुरू, शुभम दुबेवर लागली बोली

लिलावाची पुढील फेरी सुरू झाली आहे. ब्रेकनंतर पहिली बोली भारतीय खेळाडू शुभम दुबेवर लागली आहे. शुभमची मूळ किंमत 20 लाख रुपये आहे.

https://twitter.com/IPL/status/1737075063357100227

16:56 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : आतापर्यंतचे सर्वात महागडे खेळाडू

मिचेल स्टार्क 24.75 कोटी कोलकाता नाईट रायडर्स

पॅट कमिन्स 20.05 कोटी सनरायझर्स हैदराबाद</p>

डॅरेल मिशेल 14.75 कोटी चेन्नई सुपर किंग्स

हर्षल पटेल 11.74 कोटी पंजाब किंग्ज</p>

16:07 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : आता पाचवा सेट कॅप्ड फिरकी गोलंदाजांचा आहे

आता कॅप्ड खेळाडूंचे सेट संपले आहेत. जे खेळाडू येथे विकले गेले नाहीत ते पुन्हा बोलीमध्ये विकले जाऊ शकतात. मात्र, या सर्व खेळाडूंवर पुन्हा बोली लावली जाणार नाही. यापैकी ज्या खेळाडूंची नावे फ्रँचायझी देतील त्यांनाच पुन्हा लिलावासाठी आणले जाईल. पुढील सेटमध्ये ज्या खेळाडूंनी आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही, त्यांच्यावर बोली लावली जाईल. यातील बहुतांश खेळाडू भारतीय अंडर-19 संघ आणि देशांतर्गत क्रिकेटमधील असतील.

16:03 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : तबरेझसोबत मुजीबलाही खरेदीदार मिळाला नाही.

दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज तबरेझ शम्सीची मूळ किंमत 50 लाख रुपये होती. तो अनसोल्ड राहिला. न्यूझीलंडचा गोलंदाज ईश सोधीही विकला गेला नाही. त्याची मूळ किंमत 75 लाख रुपये होती. अफगाणिस्तानचा गोलंदाज मुजीब उर रहमानची मूळ किंमत 2कोटी रुपये होती. तो पण अनसोल्ड राहिला.

https://twitter.com/IPL/status/1737057558513242453

16:01 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : इंग्लंडचा आदिल रशीद राहिला अनसोल्ड

अफगाणिस्तानचा गोलंदाज वकार सलामखेलची मूळ किंमत ५० लाख रुपये होती. मात्र त्यांच्यावर कोणी बोली लावली नाही. इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदिल रशीदही विकला गेला नाही. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. वेस्ट इंडिजचा खेळाडू अकिल हुसेनही विकला गेला नाही.

https://twitter.com/IPL/status/1737056948527235085

15:58 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : मधुशंकाला मुंबईने विकत घेतले

श्रीलंकेचा गोलंदाज दिलशान मदुशंकाची मूळ किंमत ५० लाख रुपये होती. लखनौने त्याच्यावर पहिली बोली लावली. यानंतर मुंबईने बोली लावायला सुरुवात केली. अखेर मदुशंकाला मुंबईने 4.60 कोटींना विकत घेतले.

https://twitter.com/IPL/status/1737056309202014469

15:56 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 :जयदेव उनाडकटला हैदराबादने खरेदी केले

भारतीय खेळाडू जयदेव उनाडकटची मूळ किंमत ५० लाख रुपये होती. सनरायझर्स हैदराबादने त्याच्यावर पहिली बोली लावली. यानंतर दिल्ली कॅपिटल्सही खेळात उतरली. पण शेवटी हैदराबादने बाजी मारली. हैदराबादने जयदेवला 1.60 कोटींना खरेदी केले.

https://twitter.com/IPL/status/1737055323947401708

15:50 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : स्टार्कने कमिन्सचा मोडला विक्रम , आयपीएल इतिहासातील ठरला सर्वात महागडा खेळाडू

दिल्ली कॅपिटल्सने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कवर पहिली बोली लावली. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. मुंबई आणि दिल्ली दरम्यान 9.60 कोटी रुपयांपर्यंतची बोली लागली. यानंतर गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सने बोली लावायला सुरुवात केली. अखेर कोलकाताने स्टार्कला २४.७५ कोटींना विकत घेतले.

https://twitter.com/cricbuzz/status/1737054346083512645

15:35 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : लखनऊ सुपर जायंट्सने शिवम मावीला खरेदी केले

भारतीय वेगवान गोलंदाज शिवम मावीची मूळ किंमत 50 लाख रुपये होती. त्याला लखनऊ सुपर जायंट्सने 6.40 कोटींना विकत घेतले. शिवम मावीला विकत घेण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 6.20 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली होती. पण लखनऊ सुपर जायंट्सने शिवम मावीला खरेदी केले.

https://twitter.com/code_with_ssn/status/1737051541054562369

15:30 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : गुजरात टायटन्सने उमेश यादवला 5.80 कोटींना खरेदी केले

भारतीय गोलंदाज उमेश यादवची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. त्याला खरेदी करण्यासाठी सुरुवातीला सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात स्पर्धा होती. यानंतर दिल्ली कॅपिटल्सही खेळात उतरली. पण गुजरात जिंकला. उमेश यादवला गुजरातने 5.80 कोटींना खरेदी केले.

https://twitter.com/techind34820937/status/1737050098142437671

15:24 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : अल्झारी जोसेफला आरसीबीने 11.5 कोटी रुपयांना विकत घेतले

1 कोटी रुपयांची मूळ किंमत असलेल्या अल्झारी जोसेफला आरसीबीने 11.50 कोटी रुपयांना विकत घेतले. लखनऊ सुपर जायंट्सने जोसेफला खरेदी करण्यासाठी 11.25 कोटी रुपये पर्यंत बोली लावली. पण शेवटी आरसीबीचा विजय झाला.

https://twitter.com/IPL/status/1737046849360417175

15:23 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : लॉकी फर्ग्युसन अनसोल्ड राहिला

न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजावर कोणत्याही संघाने बाजी मारली नाही. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती.

https://twitter.com/IPL/status/1737046349609136218

15:19 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : कोलकाताने चेतन साकारियाला विकत घेतले

भारतीय वेगवान गोलंदाज चेतन साकारियाची मूळ किंमत 50 लाख रुपये होती. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने मूळ किमतीत विकत घेतले. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. त्याला कोणताही खरेदीदार सापडला नाही. फर्ग्युसन न विकले गेले.

https://twitter.com/nipplow/status/1737046887734345905

15:17 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : कुसल मेंडिस इंग्लिशसह अनसोल्ड राहिला

ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज जोश इंग्लिश अनसोल्ड राहिला. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. श्रीलंकेचा खेळाडू कुसल मेंडिसही विकला गेला नाही. त्याची मूळ किंमत 50 लाख रुपये होती.

https://twitter.com/IPL/status/1737045891570110652

15:14 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : केएस भरत आणि स्टब्स यांना मिळाली आधारभूत किंमत

भारतीय यष्टिरक्षक फलंदाज केएस भरतची मूळ किंमत ५० लाख रुपये होती. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने विकत घेतले. दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज ट्रिस्टन स्टब्सची मूळ किंमत ५० लाख रुपये होती. दिल्ली कॅपिटल्सने त्याला आधारभूत किमतीत खरेदी केले.

https://twitter.com/IPL/status/1737045429508800899

15:11 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : फिलिप सॉल्ट अनसोल्ड राहिला

पुढील फेरीची बोली सुरू झाली आहे. इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज फिलिप सॉल्टवर बोली लावली जात आहे. त्याची मूळ किंमत 1.50 कोटी रुपये आहे. पण त्यांना कोणीही विकत घेतले नाही.

https://twitter.com/IPL/status/1737044781035934046

15:07 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : तिसरा सेट कॅप्ड वेगवान गोलंदाजांचा आहे

हा संच अशा वेगवान गोलंदाजांचा आहे, ज्यांनी आपल्या देशासाठी किमान एक सामना खेळला आहे. या सेटमध्ये सर्वांच्या नजरा मिचेल स्टार्क आणि उमेश यादव या खेळाडूंवर असतील.

15:03 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : आतापर्यंतचे सर्वात महागडे खेळाडू

आयपीएल 2024 मधील आतापर्यंतचे सर्वात महागडे खेळाडू -

पॅट कमिन्स - 20.05 कोटी - सनरायझर्स हैदराबाद</p>

डॅरेल मिशेल - 14.75 कोटी - चेन्नई सुपर किंग्ज</p>

हर्षल पटेल -11.74 कोटी -पंजाब किंग्स

IPL Auction 2024 Live Updates in Marathi: आयपीएल लिलाव २०२४ लाइव्ह अपडेट्स 

IPL Auction 2024 Highlights in Marathi: या लिलावात एकूण ७२ खेळाडूंची विक्री झाली. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क सर्वात महागडा ठरला. स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने २४.७५ कोटींना विकत घेतले.