PL 2025 PBKS vs MI Highlights: आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये या हंगामातील सर्वात महत्वाचा सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने पहिल्या डावात फलंदाजी करताना पंजाबसमोर विजयासाठी १८५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबने ७ गडी राखून विजयाची नोंद केली आहे. यासह पंजाबने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे. तर मुंबईचा संघ चौथ्या स्थानी कायम आहे.पंजाबची १ नंबर कामगिरी! मुंबईला नमवत मिळवला दमदार विजयtw

Live Updates

IPL 2025, Punjab Kings vs Mumbai Indians Highlights: पंजाब किंग्ज विरूद्ध मुंबई इंडियन्स हायलाईट्स

23:13 (IST) 26 May 2025

PBKS vs MI Live: मुंबईला दिलासा! सँटनरने मिळवून दिली विकेट

मुंबई इंडियन्सला क्षणभर दिलासा मिळाला आहे. मिचेल सँटनरने जोश इंग्लिशला बाद करत माघारी धाडलं आहे.

22:56 (IST) 26 May 2025

PBKS vs MI Live: मुंबईचं कमबॅक, प्रियांश आर्या परतला तंबूत; पंजाब विजयाच्या जवळ

हातून निसटलेल्या सामन्यात मिचेल सँटनरने मुंबई इंडियन्सला कमबॅक करून दिलं आहे. प्रियांश आर्या बाद होऊन माघारी परतला आहे.

22:45 (IST) 26 May 2025

PBKS vs MI Live: मुंबईच्या हातून सामना निसटतोय! पंजाब विजयाच्या जवळ

हा सामना मुंबईच्या हातून निसटतोय. प्रभसिमनरन सिंग बाद झाल्यानंतर जोश इंग्लिश आणि प्रियांश आर्या यांनी अर्धशतकी खेळी करत पंजाबला विजयाच्या अगदी जवळ पोहोचवलं आहे.

22:17 (IST) 26 May 2025

PBKS vs MI Live: पंजाबच्या ५० धावा पूर्ण! प्रियांश आर्या मुंबई इंडियन्सवर भारी पडणार?

पंजाब किंग्जला हा सामना जिंकण्यासाठी १८५ धावा करायच्या आहेत. या धावांचा पाठलाग करताना प्रियांश आर्याने दमदार फलंदाजी करत संघाची धावसंख्या ५० धावांच्या पार पोहोचवली आहे.

22:03 (IST) 26 May 2025

PBKS vs MI Live: लागोपाठ २ झेल सुटले, पण प्रभसिमरन सिंग जाळ्यात अडकला

प्रभसिमरन सिंगला दोनदा संधी मिळाली, पण जसप्रीत बुमराह गोलंदाजीला येताच प्रभसिमरन सिंग बाद होऊन माघारी परतला आहे.

21:27 (IST) 26 May 2025

PBKS vs MI Live: सूर्याचं दमदार अर्धशतक! मुंबईने पंजाबसमोर ठेवलं इतक्या धावांचं आव्हान

या सामन्यात मुंबई इंडियन्सने पहिल्या डावात फलंदाजी करताना १८४ धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादवने शानदार अर्धशतकी खेळी केली. दोन्ही संघांकडे नंबर १ स्थानी जाण्याची संधी आहे. पंजाबला हा सामना जिंकण्यासाटी १८५ धावा करायच्या आहेत.

21:15 (IST) 26 May 2025

PBKS vs MI Live: सूर्याचं अर्धशतक पूर्ण! मुंबई मजबूत स्थितीत

सूर्यकुमार यादव या सामन्यातही चमकला आहे. त्याने या सामन्यात फलंदाजी करताना ३४ चेंडूंचा सामना करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.

20:30 (IST) 26 May 2025

PBKS vs MI Live: तिलक पुन्हा एकदा फ्लॉप! मुंबईचे ३ फलंदाज तंबूत

मुंबई इंडियन्सला तिसरा मोठा धक्का बसला आहे. तिलक वर्मा या सामन्यातही फ्लॉप ठरला आहे. तो १ धाव करत माघारी परतला आहे.

20:21 (IST) 26 May 2025

PBKS vs MI Live: मुंबईची सलामी जोडी तंबूत! रोहित शर्मा बाद होऊन परतला माघारी

रायन रिकल्टन बाद झाल्यानंतर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवने एक बाजू धरून ठेवली होती. मात्र, रोहित शर्मा २४ धावा करत माघारी परतला आहे.

19:57 (IST) 26 May 2025

PBKS vs MI Live: मुंबईला पहिला मोठा धक्का! रायन रिकल्टन परतला तंबूत

मुंबई इंडियन्सला पहिला मोठा धक्का बसला आहे. संघातील सलामीवीर फलंदाज रायन रिकल्टन बाद होऊन माघारी परतला आहे.

19:36 (IST) 26 May 2025

PBKS vs MI LIVE: सामन्याला सुरूवात

रायन रिकल्टन आणि रोहित शर्माची जोडी मैदानावर उतरली आहे. पहिल्या षटकात चौकार लगावत रिकल्टनने चांगली सुरूवात केली.

19:09 (IST) 26 May 2025
PBKS vs MI LIVE: पंजाब किंग्सची प्लेईंग इलेव्हन

प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (विकेटकिपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, मार्को जॅनसेन, हरप्रीत ब्रार, काइल जेमिसन, विजयकुमार वैशाक, अर्शदीप सिंग

19:07 (IST) 26 May 2025
PBKS vs MI LIVE: मुंबई इंडियन्सची प्लेईंग इलेव्हन

रायन रिकेल्टन (विकेटकिपर), रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह

19:03 (IST) 26 May 2025
PBKS vs MI LIVE: नाणेफेक

पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स सामन्याची नाणेफेक पंजाबने जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह मुंबईचा संघ प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. दोन्ही संघांच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल झाले आहेत. पंजाबच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये काईल जेमिसन आणि विजयकुमार वैशाख खेळताना दिसणार आहेत. तर मुंबईच्या ताफ्यात एक बदल असून गोलंदाजीत अश्वनी कुमार प्लेईंग इलेव्हनमध्ये सामील होईल.

rohit sharma hardik pandya

IPL 2025 PBKS vs MI Highlights: आज पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये अतिशय महत्वाचा सामना पार पडला.