SKY turns Mumbai Luck: बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने अवघ्या ३५ चेंडूंत ८३ धावांची खेळी केली, ज्यात सूर्याने ७ चौकार आणि ६ उत्तुंग षटकार ठोकले. सूर्यकुमार यादवने २३७.१४ च्या स्ट्राईक रेटने बंगळुरूच्या गोलंदाजीचा धुमाकूळ घातला. यादरम्यान सूर्याने आयपीएलमध्ये ३००० धावा पूर्ण केल्या. सूर्या ६३ धावांवर असताना त्याने आयपीएल कारकिर्दीतील ३००० धावा पूर्ण केल्या. त्याचे आयपीएल कारकिर्दीतील हे २०वे अर्धशतक होते. याशिवाय सूर्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत १०० षटकारही मारले आहेत.

या सामन्यात ‘मिस्टर ३६०’ अशी ओळख असणारा सूर्या पूर्ण रंगात दिसला, त्याने असे अनेक फटके मारले ज्यासाठी तो ओळखला जातो. जेव्हा ‘द-स्काय’ आऊट झाला तेव्हा विराट कोहली त्याच्याजवळ गेला आणि त्याला आलिंगन देत त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली, दुसरीकडे ‘गॉड ऑफ क्रिकेट’ सचिन तेंडुलकरही त्याचे कौतुक करण्यासाठी ड्रेसिंगरुममध्ये उभा राहिला. हा असा क्षण अक्षरशः डोळ्यात साठव्ण्यासारखा होता, त्याचे चाहतेही भावूक झाले. सूर्याच्या शानदार खेळीच्या जोरावर मुंबईने १७व्या षटकातच सामना जिंकला.

Confusion on Virat's wicket in , KKR vs RCB match
KKR vs RCB : आऊट की नॉट आउट? अंपायरच्या निर्णयावर विराट कोहली दिसला नाराज, जाणून घ्या काय आहे नियम?
IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीचा अद्भुत षटकार! संपूर्ण कारकिर्दीत माहीने पहिल्यांदाच लगावला भन्नाट शॉट; एबी-सूर्यालाही विसराल
Surya's revelations about Bumrah
MI vs RCB : जसप्रीत बुमराहला नेट्समध्ये खेळायला घाबरतो सूर्यकुमार यादव, स्वत:च केला खुलासा; म्हणाला तो…
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

आरसीबीच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण सूर्याची खेळी असली तरी विराट कोहली त्याचे कौतुक केल्याशिवाय राहू शकला नाही. काही वर्षांपूर्वी विराटने सूर्याचे लक्ष विचलित करण्यासाठी स्लेजचा वापर केला होता हे क्रिकेटप्रेमी विसरणार नाहीत. तेव्हा त्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. मात्र, काळ बदलला आहे. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विराट विरोधी संघात असूनही सूर्याचे अभिनंदन करत आहे.

हेही वाचा: World Cup 2023: विश्वचषक २०२३साठी ‘हे’ आठ संघ ठरले पात्र! माजी विजेत्यांसह दोन जागांसाठी खेळणार पात्रता फेरीचे सामने

माहितीसाठी, सूर्या आणि नेहल वढेरा यांनी तिसर्‍या विकेटसाठी अवघ्या ६३ चेंडूत १४० धावांची भागीदारी केली, ज्यामुळे सामना पूर्णपणे बदलला. या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ गडी गमावून १९९ धावा केल्या, त्यानंतर मुंबईने १६.३ षटकात ४ गडी गमावून २०० धावा करत लक्ष्य गाठले. या विजयासह मुंबई आता गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. सूर्यकुमार यादवने ३५ चेंडूत ८३ धावांची दमदार खेळी केली. या खेळीत त्याने ७ चौकार आणि ६ षटकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट २३७.१४ होता.