KKR Players Dressing Room Amazing Celebration Video : कोलकाता नाइट रायडर्सने इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) चे विजेतेपद पटकावले आहे. चेन्नईच्या एमएम चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात केकेआरने सनरायझर्स हैदराबादचा आठ गडी राखून पराभव करत आयपीएल ट्रॉफीवर कब्जा मिळवला. या विजयासह कोलकाता नाईट रायडर्सने तिसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. यामुळे कोलकाता नाईट रायडर्स तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन झाला आहे. मात्र केकेआरच्या विजयानंतर सनरायझर्स हैदराबादचे दुसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावण्याचे स्वप्न संपुष्टात आले, या दमदार विजयानंतर केकेआरच्या खेळाडूंनी एकच जल्लोष साजरा केला. ट्रॉफी जिंकल्यानंतर केकेआरचे खेळाडू मैदानातून ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले. केकेआरकडून ड्रेसिंग रूममधील जबरदस्त सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये श्रेयस अय्यर हातात ट्रॉफी घेऊन चक्क नाचताना पाहायला मिळत आहे.

विजयानंतर खेळाडूंनी मैदानावर केली खूप धमाल

सामन्यातील विजयानंतर केकेआरचे खेळाडू मैदानावर जल्लोष करताना दिसले. त्यानंतर मैदानावर पुरस्कार सोहळा पार पडला. नंतर सर्व खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले. यावेळी श्रेयस अय्यर ट्रॉफी घेऊन पोहोचताच खेळाडूंनी एकच जल्लोष केला, यावेळी खेळाडूंनी केक कापला अन् बिअर उडवून विजयाचा आनंदोत्सव साजरा केला. तसेच श्रेयस अय्यर हातात ट्रॉफी घेऊन डान्स स्टेप्स करताना दिसला तर त्याचबरोबर इतर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफही नाचताना दिसला. एकूणच केकेआरच्या खेळाडूंमध्ये पार्टीचा माहोल होता.

“गुजराती ब्रेन”, घटस्फोटानंतरही नताशाला मिळणार नाही हार्दिकच्या संपत्तीतील ७० टक्के हिस्सा? नेटकरी म्हणाला, “भावाने आयुष्यभर….”

श्रेयस अय्यर नाचत ट्रॉफी घेऊन ड्रेसिंग रूममध्ये जात असताना बाहेर उभे असलेल्या अनेक चाहत्यांनी केकेआर, केकेआर अशा घोषणा देत विजयाचा आनंद साजरा केला. अनेक चाहते आयपीएल ट्रॉफीचा एक फोटो मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी धडपडताना दिसले. यावेळी चाहत्यांनी केकेआरच्या खेळाडूंचे अभिनंदन केले.

फायनल सामन्यात नेमकं काय घडलं?

फायनल सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करताना संपूर्ण संघ केकेआरच्या गोलंदाजांसमोर खेळपट्टीवर झुंजताना दिसत होता. संघाने १८.३ षटकात ११३ धावा केल्या आणि कोलकाता नाईट रायडर्सला ११४ धावांचे सोपे लक्ष्य दिले. ज्या लक्ष्याचा केकेआर संघाने सहज पाठलाग केला. केकेआरने हा सामना ८ विकेटने जिंकला.

IPL 2024 फायनल: दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

इंपॅक्ट प्लेयर : अनुकुल रॉय, मनीष पांडे, नितीश राणा, केएस भरत, शेरफेन रदरफोर्ड.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.
इंपॅक्ट प्लेयर :: उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, मयंक मारकंडे, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर.