Krunal Pandya Become Player of the Match in IPL 2025 Final : आयपीएल स्पर्धेची सुरूवात झाल्यापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आयपीएल चषक उंचावण्याचं स्वप् उराशी बाळगून होता. या संघात अनेक दिग्गज खेळाडू आले आणि गेले. त्यांनी तीन वेळा या संघाला स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचवलं. मात्र, तिन्ही वेळा या संघाच्या पदरी निराशाच आली. विराट कोहली मात्र १८ वर्षे या संघाबरोबर राहिला आणि अखेर १७ वर्षांनंतर आपलं स्वप्न त्याने पूर्ण केलं.

बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ९ बाद १९० धावांपर्यंत मजल मारली होती. १९१ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबला केवळ ७ बाद १८४ धावांपर्यंत मजल मारता आली. बंगळुरूच्या गोलंदाजांनी शेवटपर्यंत पंजाबच्या फलंदाजांवर अंकूश ठेवल्याने बंगळुरूला हा सामना जिंकता आला. बंगळुरूचा फिरकीपटू कृणाल पांड्या या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने ४ षटकांत अवघ्या १७ धावा देत दोन महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केलं. तर, भुवनेश्वर कुमारने चार षटकांत ३८ धावा देत दोन बळी घेतले. तसेच यश दयाल, जॉश हेझलवूड व रोमारियो शेफर्डने प्रत्येक एक बळी टिपत कृणालला चांगली साथ दिली.

कृणाल पांड्याची उत्कृष्ट कामगिरी

दरम्यान, कृणाल पांड्याने या कामगिरीसह मोठा इतिहास घडवला आहे. दोन आयपीएल फायनलमध्ये सामनावीराचा पुरस्कार पटकावणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे. आतापर्यंत आयपीएलच्या १८ मोसमात १६ वेगवेगळ्या खेळाडूंनी हा पुरस्कार पटकावला आहे. तर कृणाल पांड्याने हा पुरस्कार दोन वेळा पटकावला आहे. याआधी त्याने मुंबई इंडियन्सकडून खेळताना २०१७ च्या आयपीएल फायनलमध्ये अशीच कामगिरी केली होती. त्या सामन्यात कृणालने अष्टपैलू कामगिरी केली होती. आधी चार षटकांत ३१ धावा दिल्या होत्या. त्यानंतर त्याने फलंदाजी करताना ३८ चेंडूत ४७ धावांची निर्णायक खेळी केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयपीएलच्या मागील १८ हंगामांच्या १८ फायनलमधील सामनावीर

वर्षसामनाखेळाडू
२००८-राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जयुसुफ पठाण
२००९-डेक्कन चार्जर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूअनिल कुंबळे
२०१०-चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्ससुरेश रैना
२०११-चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमुरली विजय
२०१२-कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज</td>मनविंदर बिस्ला
२०१३-मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जकायरन पोलार्ड
२०१४-कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्जमनीष पांडे
२०१५-मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जरोहित शर्मा
२०१६-सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूबेन कटिंग
२०१७-मुंबई इंडियन्स विरुद्ध रायझिंग पुणे सुपरजायंटकृणाल पंड्या
२०१८-चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबादशेन वॉटसन
२०१९-मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जजसप्रीत बुमराह
२०२०-मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सट्रेंट बोल्ट
२०२१-चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सफाफ डू प्लेसिस
२०२२-गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सहार्दिक पंड्या
२०२३-चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्सडेव्हॉन कॉनवे
२०२४-कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबादमिचेल स्टार्क
२०२५ –रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज</td>कृणाल पांड्या

आरसीबीची पंजाबवर मात

या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून बंगळुरूला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. पंजाबच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. काईल जेमिसन व अर्शदीप सिंगने प्रत्येक ३ बळी घेत बंगळुरूच्या फलंदाजीचंकंबरडं मोडलं. बंगळुरूकडून विराट कोहलीने सर्वाधिक ४३ धावा जमवल्या. तर, त्याला कर्णधार रजत पाटीदार (२६), जितेश शर्मा (२४), लियाम लिव्हिंगस्टन (२५), मयंक अग्रवाल (२४) या चौघांनी चांगली साथ दिली.