पहिल्या सामन्यात लाहोर कलंदरने मुलतान सुलतान्सचा एका धावेने पराभव केला, तर दुसऱ्या सामन्यात पेशावर झल्मीने कराची किंग्जचा २ धावांनी पराभव केला. लीगचा दुसरा सामना लक्षणीय होता कारण गतवर्षी फ्रँचायझी सोडल्यानंतर बाबर आझमचा किंग्जविरुद्धचा पहिला सामना होता; याशिवाय, कराची किंग्जकडे मोहम्मद अमीर आणि इमाद वसीम सारखे खेळाडू देखील होते, जे दोघेही सध्या पाकिस्तानच्या बाजूने खेळत नाहीत (आमिरने २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, परंतु पीसीबीमध्ये बदल झाल्यानंतर संघात परतण्याचे संकेत दिले होते.)

कराची किंग्जकडे स्टार-स्टडेड लाइनअप आहे परंतु त्यांच्या डगआउटमध्ये एक दिग्गज चेहरा देखील आहे, वसीम अक्रम त्यांचे गोलंदाजी प्रशिक्षक आहेत. त्याचप्रमाणे, पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज इंझमाम-उल-हक हे पेशावर झल्मीचे अध्यक्ष आहेत आणि नंतरच्या सामन्यानंतर अक्रमने नाट्यमय समाप्तीबद्दल चर्चा करण्यासाठी समा टीव्हीशी बोलताना त्याच्यावर खूप मजेशीर टिप्पणी केली होती.

हेही वाचा: Jyotiraditya Scindia: ‘एक शॉट अन् थेट गाठलं हॉस्पिटल! ज्योतिरादित्य सिंधियांच्या शॉटमुळे भाजप कार्यकर्ता जखमी

सध्या चॅनलच्या तज्ञ पॅनेलचा एक भाग असलेला पाकिस्तानचा आणखी एक माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी याने इंझमामला विचारले की झल्मीविरुद्धच्या सामन्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये अक्रम कसा तणावग्रस्त दिसत होता, तेव्हा इंझमामने मजेशीररित्या सांगितले की पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज ‘खूप लवकर रागावतो.’

इंझमाम म्हणाला की, “वसीम भाई को गुस्सा बहुत जल्दी आता है. और जिस तराह के अल्फाज़ वो इस्तेमाल करते हैं, आपके और मिसबाह को आयडिया हो गया होगा. म्हणजेच वसीम भाई यांना पटकन राग येतो हे तुम्हाला माहिती आहे. आणि रागाच्या भरात ते जे शब्द वापरतात ते खूप मनावर घ्यायचे नसतात. त्यांच्या रागाचा परिचय तुम्हाला आणि मिसबाह दोघांनाही आला असेलच आणि याची जाणीव सगळ्यांना आहे कारण आम्ही सर्व खूप वर्ष एकेमकांसोबत खेळलो आहोत.”  त्यावेळी आफ्रिदी आणि मिस्बाह, स्टुडिओमध्ये होते आणि हे सांगताच एकच हशा पिकला.

हेही वाचा: IND vs AUS: “जर तुमच्याकडे ६ फुट उंचीचा बॉलर असेल तर मला सांगा”, इतर संघातील गोलंदाजांशी तुलना करताना द्रविड भडकला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंझमाम पुढे म्हणाला, “दबावाच्या परिस्थितीत अशा गोष्टी सामान्य असतात. आणि हेच या खेळाचे सौंदर्य आहे. लाहोर आणि मुलतानमध्येही असाच जवळचा सामना खेळला गेला होता. अशा प्रकारे खेळाडूंना शिकायला मिळते. दबावाच्या परिस्थितीला कसे तोंड द्यावे हे त्यांना कळते, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही हेच मिळते. दबावाची पातळी सारखीच असल्याने निवडकर्ते पीएसएलवर बारीक लक्ष ठेवतात. हा एक मोठा फायदा आहे.”