scorecardresearch

Premium

सचिन तेंडुलकरने टाकली अशी गुगली की चाहते झाले बोल्ड, क्रिकेटच्या ‘या’ प्रश्नांची तुमच्याकडे आहेत का उत्तरं?

Sachin Tendulkar’s Hindi Day post goes viral: हिंदी दिनानिमित्त सचिन तेंडुलकरने क्रिकेट चाहत्यांना एक प्रश्न विचारला, ज्याने अनेकांना घाम फुटला. त्यानंतर सचिनची ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Sachin Tendulkar's funny question to fans
सचिन तेंडुलकर (फोटो-संग्रहित छायाचित्र लोकसत्ता)

Sachin Tendulkar’s funny question to fans: भारताचा मास्टर ब्लास्ट सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव मानले जाते. त्याचबरोबर भारतात क्रिकेट हा धर्म मानला जातो. खेळाडूंचीही देवाप्रमाणे पूजा केली जाते. क्रिकेटची आवड असणारा प्रत्येक माणूस स्वत:ला या खेळातील तज्ञ समजतो. गुरुवारी महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरने क्रिकेटशी संबंधित एक प्रश्न विचारला, ज्याचे उत्तर अनेक महान व्यक्तींकडे नव्हते. सचिनच्या या प्रश्नाने अनेक चाहत्यांना डोके धरायला भाग पाडले.

सचिन तेंडुलकरने एक्स (ट्विट) अॅपवर विचारला प्रश्न –

१४ सप्टेंबर हा दिवस भारतात हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. याबाबत गुरुवारी सचिन तेंडुलकरने यानिमित्ताने एक पोस्ट एक्स अॅपवर केल. या ट्विटमध्ये सचिनने चाहत्यांना काही क्रिकेट शब्दांचे हिंदी भाषांतर सांगण्यास सांगितले. सचिनने पोस्ट केली की, ‘तुम्ही मला सांगू शकाल का, खालील क्रिकेट शब्दांना हिंदीत काय म्हणतात?’ सचिनने चाहत्यांना विचारले की अंपायर, विकेटकीपर, क्षेत्ररक्षक आणि हेल्मेट यांना हिंदीत काय म्हणतात. सचिनच्या या प्रश्नाला अनेक चाहत्यांनी उत्तरे दिली आहेत.

shah rukh khan replies to fan when asked about virat kohli
विराट कोहलीबद्दल विचारलेल्या ‘त्या’ प्रश्नाला शाहरुख खानने दिलं भन्नाट उत्तर, म्हणाला, “आपला जावई…”
IND vs AUS: You didn't even call why did Amit Mishra say this to Rohit Sharma on commitment question Video during practice goes viral
IND vs AUS: “तुम्ही फोनही केला नाही…”, ‘कमिटमेंट’च्या प्रश्नावर अमित मिश्रा रोहित शर्माला असं का म्हणाला? सराव दरम्यानचा Video व्हायरल
supriya-sule
चांगला नेता कोण? ‘खुपते तिथे गुप्ते’च्या मंचावर सुप्रिया सुळे यांचा खुलासा; जालन्यातील घटनेवरही केलं भाष्य
nana patekar on naseeruddin shah
“राष्ट्रवादाच्या नावाखाली पैसे कमवणे….”, नसीरुद्दीन शाहांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नाना पाटेकरांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सत्य घटनांवर…”

क्रिकेट चाहत्यांनी दिली मजेशीर उत्तरे –

काही चाहत्यांनी अंपायरला अंपायर म्हटले, तर काहींनी त्याला निर्णय घेणारा म्हटले. काही चाहत्यांनी सांगितले की, अंपायरला हिंदीत आर्बिट्रेटर असेही म्हणतात. यष्टी रक्षक, फटकी का रखवाला आणि विकेट रक्षक असे अनेक हिंदी शब्दही यष्टीरक्षकासाठी दिले गेले. बहुतेक चाहत्यांनी क्षेत्ररक्षकासाठी क्षेत्ररक्षक हा शब्द वापरला. हेल्मेटसाठी अनेक हिंदी शब्दही चाहत्यांनी सुचवले. चाहत्यांच्या मते हेल्मेटला शिरस्त्राण, रक्षक, शीश कवच आणि टोप असे म्हणतात.

हेही वाचा – Wankhede Stadium: एम.एस. धोनीने विश्वचषक जिंकून देणारा षटकार ज्या बाकड्यांवर मारला होता, आता त्याचा MCA करणार लिलाव

सचिन तेंडुलकरची आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सनेही यावर प्रयत्न केले. फ्रँचायझीने दिलेला प्रतिसाद खूपच मनोरंजक होता. फ्रेंचायझीने लिहिले…

Umpire – विपंच
Wicket-keeper – फटकी का रखवाला
Fielder – क्षेत्ररक्षक
Helmet – शिरस्त्राण

तसेच शिवानी नावाच्या युजरने प्रश्नांच्या एक पाऊल पुढे जाऊन अशी अनेक उत्तरे दिली. जी सचिनने विचारलीही नव्हती. तिने लिहले…

क्रिकेट: गोलगट्टम लकड़ पट्टम दे दनादन प्रतियोगिता
फलंदाज: बल्लेबाज
गोलंदाज : गेंदबाज
पंच: निर्णायक
यष्टिरक्षक : यष्टि- रक्षक
क्षेत्ररक्षक: क्षेत्ररक्षक
हेल्मेट: शीश कवच

काही चाहत्यांनी सचिनला केले ट्रोल –

या ट्विट पोस्टमुळे काही चाहत्यांनी सचिनला ट्रोलही केले. सचिन देशाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर ट्विट करत नसून ते हिंदी दिनानिमित्त करत असल्याचं ते म्हणाले. अनंतनाग चकमकीत शहीद झालेल्या जवानांऐवजी हिंदी दिनी ट्विट करणे हा योग्य निर्णय नसल्याचेही काहींनी म्हटले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sachin tendulkar gave interesting answers to the questions asked by fans on the occasion of hindi day vbm

First published on: 14-09-2023 at 16:13 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×