scorecardresearch

Premium

Team India: ‘…म्हणून भारताने १० वर्षांपासून ICC Trophy जिंकली नाही’; माजी कर्णधार सौरव गांगुलीचं मोठं वक्तव्य

Sourav Ganguly Statement: आयसीसी टूर्नामेंटमध्ये टीम इंडियाला सतत पराभवाचा सामना का करावा लागत आहे? याबद्दल सौरव गांगुलीने प्रतिक्रिया दिली. टीम इंडियाने शेवटची आयसीसी ट्रॉफी २०१३ मध्ये जिंकली होती.

India Won ICC Trophy 10 Years Ago
सौरव गांगुली (फोटो-संग्रहित छायाचित्र लोकसत्ता)

Sourav Ganguly Explains Why India Didn’t Win ICC Trophy: टीम इंडिया २०१३ पासून आयसीसी टूर्नामेंटमध्ये सतत अपयशी ठरत आहे. अलीकडेच, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरला होता. आता बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी टीम इंडिया आयसीसी टूर्नामेंटमध्ये का अपयशी ठरत आहे, याचे उत्तर दिले आहे. भारतीय संघाने शेवटची आयसीसी ट्रॉफी २०१३ मध्ये इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपाने जिंकली होती.

दुसरीकडे, भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली ‘रेवस्पोर्ट्स’शी बोलताना म्हणाला की, टीम इंडियाच्या पराभवाचे कारण मानसिक आरोग्य नसून एग्जीक्यूशन आहे. सौरव गांगुली म्हणाला, “बऱ्याचदा आपण महत्त्वाच्या प्रसंगी चांगली कामगिरी करत नाही. काही मानसिक दडपण आहे, असे मला वाटत नाही. हा सगळा एग्जीक्यूशनचा खेळ आहे. खेळाडू मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहेत. लवकरच ते ही रेषाही पार करतील अशी अपेक्षा आहे.”

India captain Rohit Sharma gives clear message ahead of World Cup Said The team's goal is important
IND vs AUS, World Cup: विश्वचषकापूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्माने दिला स्पष्ट संदेश; म्हणाला, “संघाचे ध्येय…”
Pakistan vs Netherlands Cricket Cricket World Cup 2023
World Cup 2023, PAK vs NED: बाबर आझम वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये ठरला फ्लॉप, सोशल मीडियावर युजर्सनी उडवली खिल्ली
ICC Rankings: No. 1 Team India India's dominance in all three formats of cricket Only two teams in the world managed this feat
ICC Rankings: एकच नंबर! क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा बोलबाला, जगात फक्त दोन संघांना जमला हा पराक्रम
Kuldeep creates history in Sri Lanka match fourth bowler to take 150 wickets
Kuldeep Yadav: श्रीलंका-पाकिस्तान सामन्यात कुलदीपने रचला इतिहास, १५० विकेट्स घेणारा चौथा गोलंदाज; म्हणाला, “निवृत्तीनंतर मी…”

माजी कर्णधार सौरव गांगुली पुढे म्हणाला, “हो, नेहमीच आशा असते. किमान आपण डब्ल्यूटूसी फायनलसाठी तरी पात्र ठरलो होतो, ही देखील एक उपलब्धी आहे. आपल्याकडे संधी आहे, आपल्याकडे चांगले खेळाडू आहेत. त्यामुळे आशा आहे की आपण ते करु.”

हेही वाचा – IND vs WI: पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी विराट कोहलीने जिममध्ये गाळला घाम, PHOTOS आणि VIDEO होतायेत व्हायरल

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ ही स्पर्धा भारतात होणार आहे –

एकदिवसीय विश्वचषक २०२३ ही स्पर्धा भारतात आयोजित केली जात आहे. त्यामुळे चाहत्यांना घरच्या मैदानावर संघाकडून आयसीसी ट्रॉफीची अपेक्षा असेल. या स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून १९ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाणार आहे. विश्वचषकात एकूण ४८ सामने खेळले जाणार आहेत.

हेही वाचा – ENG vs AUS: ‘जर इंग्लंडने फलंदाजी…’, ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवण्यासाठी सचिन तेंडुलकरने दिला महत्त्वाचा सल्ला

याआधी २०१९ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याचवेळी २०१५ च्या विश्वचषकात टीम इंडियाला उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने विजेतेपद पटकावले होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sourav ganguly said reason india has not won an icc trophy for 10 years is not mental health but execution vbm

First published on: 09-07-2023 at 15:56 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×