भारत आणि न्यूझीलंड विरुद्ध तीन सामन्यांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या महत्त्वाच्या सामन्याच्या एक दिवस आधी भारतीय टी२० संघाचा उपकर्णधार सूर्यकुमार यादव पत्रकार परिषदेत पोहोचला आणि पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यादरम्यान सूर्याला फिनिशरबद्दल प्रश्न विचारण्यात आला, ज्याच्या उत्तरात त्याने महेंद्रसिंग धोनीचा संदर्भ देत असे उत्तर दिले, जो खूप व्हायरल होत आहे. या मालिकेतील पहिला सामना रांचीमध्ये तर दुसरा सामना लखनऊमध्ये खेळवण्यात आला. रांचीमध्ये टीम इंडियाला २१ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले, तर लखनऊमध्ये भारताने सहा विकेट्सने सामना जिंकला. सूर्याने दोन्ही सामन्यात महत्त्वपूर्ण खेळी खेळली.

रांचीमध्ये सूर्याने ३४ चेंडूत ४७ धावा केल्या आणि जोपर्यंत तो क्रीजवर होता तोपर्यंत टीम इंडिया सामना बाहेर काढेल असे वाटत होते. आणि लखनौमधील लो-स्कोअरिंग सामन्यात सूर्याने ३१ चेंडूत नाबाद २६ धावा केल्या आणि भारताला विजय मिळवून देऊन मैदानातून परतला. तिसऱ्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यापूर्वी, पत्रकाराने सूर्यकुमार यादवला विचारले की लक्ष्याचा पाठलाग करताना तो दबावाच्या परिस्थितीत स्वतःला कसे शांत ठेवतो.

यावर उत्तर देताना सूर्या म्हणाला, “टी२० रांचीमध्ये सुरू झाली, त्यामुळे शांत वृत्ती तिथूनच आली. पण मला वाटते की आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्यापूर्वी बरेच देशांतर्गत क्रिकेट खेळल्याने फायदा झाला. कारण देशांतर्गत क्रिकेटमध्ये आम्ही कठीण विकेट्सवर आव्हानात्मक परिस्थितीत खेळतो, त्यामुळे मी तिथून जे काही शिकलो ते पुढे नेत आहे. सीनियर खेळाडूंना खेळताना पाहून मला खूप काही शिकायला मिळाले, त्याशिवाय ते कठीण प्रसंगांना कसे सामोरे जातात याबद्दल त्यांच्याशी बोलूनही खूप माहिती मिळाली.”

जुन्या चेंडूवर काळजीपूर्वक फलंदाजी करावी लागेल

सूर्यकुमार यादवने या वर्षी वनडे क्रिकेटमध्ये जे तीन सामने खेळले त्यात चेंडू थोडा जुना असताना फलंदाजीला आला. सूर्यकुमार यादवला स्वीप, रिव्हर्स स्वीप, पॅडल स्कूप असे फटके मारायला आवडतात. टी२० मध्ये, सूर्यकुमार यादव चेंडू नवीन असल्याने असे शॉट्स आरामात खेळतो, परंतु चेंडू थोडा जुना झाल्यावर हे शॉट मारताना बाद होण्याचा धोका असतो.

हेही वाचा: Shahid Afridi: पाकिस्तान बोर्डाचा अजब कारभार! प्रशिक्षकाच्या निर्णयावर शाहीद आफ्रिदी संतापला म्हणाला, “आता काय ऑनलाईन क्रिकेट…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूर्यकुमार यादवही चेंडूच्या वेगाचा चांगलाच फायदा घेतो. यामुळे, तो फाईन लेगवर, सरळ किंवा विकेटच्या मागे आरामात शॉट्स मारू शकतो. पण चेंडू जुना असेल आणि थोडा पॉज घेऊन येत असेल तर असे फटके खेळणे धोक्याचे असते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादवच्या फ्लॉपचे एक कारण हे देखील असू शकते की तो अधिक टी२० खेळल्यामुळे २० षटकांच्या मोडमधून बाहेर पडू शकत नाही.