Virat Kohli getting angry with fan video viral : विराट कोहली हे या देशातील असं व्यक्तिमत्व आहे, ज्याच्यासोबत प्रत्येक चाहत्याला सेल्फी घेण्याची इच्छा असते. जेव्हा कधी विराट सार्वजनिक ठिकाणी दिसतो, तेव्हा लगेच चाहत्यांची गर्दी त्याच्याजवळ जमते. या कारणामुळे विराट कधी-कधी त्याच्या सार्वजनिक ठिकाणी फिरू शकत नाही आणि याचा अनेकदा त्याने अनुभव घेतला आहे. आता त्याचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चाहत्यांनी त्याला घेरल्यानंतर तो वैतागलेला दिसला.

विराट कोहलीही त्याच्या चाहत्यांची सेल्फीची इच्छा पूर्ण करतो. मात्र, यावेळी मुंबईत कोहलीला त्याच्या एका चाहत्याचा राग आला. त्याने थोड्याशा रागाच्या स्वरात चाहत्याला दूर राहण्यास सांगितले. यावेळी कोहलीच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. कोहलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कोहली कुठेतरी जात आहे आणि त्याचे चाहते त्याच्याभोवती आहेत. तेव्हा कोहली म्हणतो, “भाई, मेरा रास्त मत रोको.” यादरम्यान कोहली संतापलेल्या स्वरात बोलत असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.

विराट कोहली चाहत्यावर संतापला –

त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये एका चाहत्याला कोहलीसोबत सेल्फी घ्यायचा असताना, कोहली त्याला बाजूला ढकलतो. यादरम्यान त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्टपणे दिसत होता. सध्या भारताचा हा स्टार खेळाडू आपल्या खराब फॉर्मशी झुंज देत आहे. त्याचा हा फॉर्म सध्या भारतासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये कोहलीची बॅट तळपताना दिसली नाही. त्याने पाच सामन्यांमध्ये १९० धावा केल्या होत्या. त्यापैकी फक्त एका सामन्यात त्याने शतक झळकावले होते, जे त्याने पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात केले होते.

हेही वाचा – Harbhajan Singh : ‘सर्फराझने ड्रेसिंग रूमच्या गोष्टी लीक केल्या असतील तर कोचने…’, हरभजन सिंगची संतप्त प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मालिकेनंतर टीम इंडियाच्या कसोटी संघात बदलाचे वारे वाहत आहे. यादरम्यान अनेक प्रकारच्या बातम्याही समोर येत आहेत. मालिकेनंतर बीसीसीआयचे अधिकारी आणि संघ व्यवस्थापन यांच्यात झालेल्या आढावा बैठकीत अनेक निर्णय घेतले आहेत. त्याचबरोबर खेळाडूंसाठी १० नवीन नियम जारी करण्यात आले आहेत. त्यापैकी एक म्हणजे खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभागी व्हावे लागेल. त्यामुळे खूप वर्षांनी विराट कोहली दिल्लीसाठी रणजी क्रिकेट खेळताना भाग घेताना दिसू शकतो.