क्रॅमनिकला नमवून आनंदने स्पार्कासन करंडक जिंकला

चौथ्या डावात बरोबरीनंतर २.५-१.५ अशा फरकाने वर्चस्व

चौथ्या डावात बरोबरीनंतर २.५-१.५ अशा फरकाने वर्चस्व

डॉर्टमंड : माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने रविवारी चौथ्या डावात परंपरागत प्रतिस्पर्धी व्लादिमिर क्रॅमनिकला बरोबरीत रोखले आणि स्पार्कासन करंडक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली.

चार डावांच्या ‘नो कॅसलिंग’ लढतीत आनंदने क्रॅमनिकाला २.५-१.५ अशा फरकाने हरवले. निर्णायक डावात टॅरॅश व्हॅरिएशनचा डाव रचत आनंदने ४० चालींनंतर क्रॅमनिकशी बरोबरीचा प्रस्ताव मान्य केला.

आनंदने मंगळवारी सलामीचा डाव जिंकत आघाडी घेतली, मग बुधवारी दुसरा डाव बरोबरीत सुटला. तिसऱ्या डावात आनंद आणि क्रॅमनिकने ६१ चालींत बरोबरी स्वीकारली. क्रॅमनिकने चिवट झुंज देत आव्हान जिवंत राखले होते. सामन्यातील उत्कंठा वाढवण्यासाठी ‘नो कॅसलिंग’  लढतीत कॅसलिंगला परवानगी नसते. बुद्धिबळात राजाच्या संरक्षणासाठी ‘कॅसलिंग’ या एकाच चालीत राजा आणि हत्ती हे दोन मोहऱ्यांच्या जागा बदलता येतात.

गेल्या आठवडय़ात झ्ॉग्रेब येथे झालेल्या क्रोएशिया बुद्धिबळ स्पध्रेत (जलद आणि अतिजलद) आनंदने उपविजेतेपदासह दिमाखदार पुनरागमन केले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Viswanathan anand defeated vladimir kramnik wins sparkassen trophy zws

ताज्या बातम्या