सॅमसंगने या महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच दोन नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केलेत. कंपनीने Samsung Galaxy F02s आणि Galaxy F12 हे दोन स्मार्टफोन आणले असून यातील Samsung Galaxy F12 आज(दि.१२) पहिल्यांदाच विक्रीसाठी सेलमध्ये उपलब्ध होणार आहे. गॅलेक्सी एफ12मध्ये चार रिअर कॅमेऱ्यासोबत नॉच डिस्प्ले आहे.  जाणून घेऊया फोनची किंमत आणि फिचर्सबाबत…

Samsung Galaxy F12 किंमत :-
Samsung Galaxy F12 च्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजची किंमत 10,999 रुपये आणि 4 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजची किंमत 11,999 रुपये आहे. हा फोन सेलेस्टियल ब्लॅक, सी ग्रीन आणि स्काय ब्लू अशा तीन रंगांच्या पर्यायात खरेदी करता येईल. आज(दि.१२) दुपारी 12 वाजेपासून सॅमसंगच्या ऑनलाइन स्टोअर आणि फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर या फोनच्या सेलला सुरूवात झाली आहे.

Samsung Galaxy F12  स्पेसिफिकेशन्स :-
Samsung Galaxy F12 मध्ये अँड्रॉइड 11 आधारित One UI 3.1 Core चा सपोर्ट असून यात 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये सॅमसंगचा इनहाउस Exynos 850 प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात चार रिअर कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा, दुसरा 5 मेगापिक्सेलचा (अल्ट्रा वाइड लेन्स), तिसरा 2 मेगापिक्सेलचा  (मॅक्रो) आणि चौथा 2 मेगापिक्सेलचा डेफ्थ सेन्सर आहे. याशिवाय सेल्फीसाठी यात 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही आहे.

Samsung Galaxy F12 ची बॅटरी :-
Samsung ने या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ v5.0, GPS/ A-GPS, USB टाईप-सी पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक यांसारखे फिचर्स दिलेत. फोनच्या पॉवर बटणमध्ये फिंगरप्रिंट सेन्सरही आहे. यात कंपनीने 15W च्या फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 6,000mAh क्षमतेची मोठी बॅटरीही दिली आहे.