आपल्यापैकी अनेक जण डॉक्टरांना न विचारता, वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी काही औषधे घेतात. त्यामध्ये मेफ्टल नॉन-स्टेरॉइडल अँटी-इन्फ्लेमेटरी ड्रग (NSAID) हे औषध मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु, आता इथून पुढे या औषधाचा डोस घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे. कारण- इंडियन फार्माकोपिया कमिशन (IPC)ने सामान्य वेदनांपासून आराम मिळवून देणाऱ्या या औषधांबाबत एक गंभीर इशारा दिला आहे; ज्यामध्ये म्हटले आहे की, या औषधामधील घटक मेफेनॅमिक अॅसिड, ड्रेस सिंड्रोमसारख्या गंभीर अॅलर्जीक प्रतिक्रियांना चालना देतात; ज्याचा तुमच्या शरीरातील अंतर्गत अवयवांवर परिणाम होतो.

हा इशारा देताना आयपीसीने म्हटले आहे, “आरोग्य सेवा व्यावसायिक, रुग्ण आणि ग्राहकांना सल्ला देण्यात येत आहे की, वरील संशयित औषधाच्या वापराशी संबंधित रुग्णांवर होणाऱ्या दुष्परिणामांवर बारकाईने लक्ष ठेवा.” परंतु, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या औषधाचे गंभीर साइड इफेक्ट्स अत्यंत दुर्मीळ आहेत; तसेच ते आधीपासून ज्ञात आहेत. मात्र, डॉक्टरांनी असा इशाराही दिला आहे की, हे औषध लिहून देताना रुग्णाचं मूल्यांकन करणं गरजेचं आहे. कारण- या औषधाची प्रतिक्रिया वैयक्तिकदृष्ट्या रुग्णावर अवलंबून असते. तसेच खरी समस्या औषधाच्या अनियंत्रित वापरासंबंधी आहे. खरं तर, हे एक प्रिस्क्रिप्शन औषध आहे; परंतु भारतामध्ये मासिक पाळीच्या वेदना, डोकेदुखी, स्नायू व सांधेदुखी यांसह विविध कारणांसाठी मोठ्या प्रमाणावर मेफेनॅमिक अॅसिडचा वापर केला जातो, तसेच मुलांना ताप आल्यावरही याचा वापर केला जातो.

हेही वाचा- व्हेगन आहारामुळे खराब कोलेस्ट्रॉल झटपट कमी होऊ शकते का? नव्या अभ्यासाबाबत तज्ज्ञ काय सांगतात…

साइड इफेक्ट ड्रेस सिंड्रोम म्हणजे काय?

ड्रेस सिंड्रोम (ड्रेस सिंड्रोम ही विशिष्ट औषधांमुळे होणारी गंभीर अॅलर्जी आहे.) ही एक गंभीर अॅलर्जिक प्रतिक्रिया आहे; जी जवळपास १० टक्के व्यक्तींना प्रभावित करते आणि ती खूप घातक व विशिष्ट औषधांमुळे होते. या लक्षणांमध्ये त्वचेवर पुरळ, ताप व लिम्फॅडेनोपॅथी यांचा समावेश होतो; जी औषध घेतल्यानंतर दोन ते आठ आठवड्यांदरम्यान उदभवू शकतात.

डॉ. सुरभी सिद्धार्थ (कन्सल्टंट ऑब्स्टेट्रिशियन अॅण्ड गायनॅकॉलॉजिस्ट, मदरहूड हॉस्पिटल, मुंबई) यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं, “आयपीसीने नुकत्याच मेफेनॅमिक अॅसिड औषधाच्या दिलेल्या इशाऱ्यानंतर हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, या औषधाशी संबंधित ड्रेस सिंड्रोममुळे त्वचेवर पुरळ, उच्च ताप यांसारख्या समस्या उदभवू शकतात. आयपीसीने रुग्णाच्या सुरक्षेसाठी औषधांच्या वापराआधी निरीक्षण आणि अहवाल देण्यावर भर दिला आहे. मेफेनॅमिक अॅसिड वापरत असल्यास संभाव्य पर्यायांसाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.”

हेही वाचा – मधुमेहींना डार्क चाॅकलेटची चव चाखता येईल का? डॉक्टर काय सांगतात जाणून घ्या… 

गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्यांकडे लक्ष द्या –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. गौतम भन्साळी (सल्लागार फिजिशियन, बॉम्बे हॉस्पिटल) सांगतात, “मेफ्टलसारख्या औषधांचा दीर्घकाळ वापर केल्याने पोटात अल्सर, रक्तस्राव आणि संबंधित गुंतागुंत होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्या असलेल्या लोकांनी खबरदारी घेतली पाहिजे.” त्याव्यतिरिक्त मेफ्टल हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी समस्यांशी संबंधित आहे. वरील धोके लक्षात घेता, आरोग्य सेवा व्यावसायिक मेफ्टलच्या जबाबदार आणि माहितीपूर्ण वापरावर जोर देतात. मेफ्टलचा उपचार सुरू करण्यापूर्वी किंवा सुरू ठेवण्यापूर्वी रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. विशेषत: अशा रुग्णांनी; ज्यांना गॅस्ट्रोइंटेस्टायनल, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी किंवा मूत्रपिंडाच्या समस्यांचा त्रास आधीपासून सुरू आहे.